लोकप्रिय अभिनेत्याला मातृशोक; भावनिक पोस्ट लिहित दिली याबाबतची माहिती

माझी आई कणखर होती....

Updated: Aug 24, 2020, 09:07 AM IST
लोकप्रिय अभिनेत्याला मातृशोक; भावनिक पोस्ट लिहित दिली याबाबतची माहिती  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आईचं छत्र हरपल्यावर होणारं दु:ख हे शब्दांत व्यक्त करता येत नाही हेच खरं. पण, अनेकदा हेच शब्द किमान भावनांचा माजलेला काहूर शांत करण्यात मदत करतात. त्यामुळं याच शब्दांचा आधार घेत एका लोकप्रिय अभिनेत्यानं आईच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. 

कॅन्सरची लागण झाल्यामुळे मायेचं छत्र हरपावं लागणारा हा अभिनेता म्हणजे गौरव चोप्रा. टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाच्या आणि प्रभावी व्यक्तीमत्त्वाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या गौरवनं एक सोशल मीडिया पोस्ट लिहित आपल्या आईच्या कणखर वृत्तीचं दर्शन सर्वांनाच घडवून आणलं. 

आईचे काही फोटो पोस्ट करत मागील तीन वर्षांपासून कॅन्सरशी सुरु असणारा तिचा लढा त्यानं सर्वांसमोर आणला. एक आई, मैत्रीण, शिक्षिका, सहकारी अशा भूमिकांमध्ये आईनं नेमकी कशी जबाबदारी पेलली हेसुद्धा त्यानं अतिशय भावनिक अशा या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

 
 
 
 

A post shared by Gaurav Chopraa (@mrgravitas) on

 

आईबाबत गौरवनं लिहिलेली ही पोस्ट पाहून आणि त्याच्या जीवनात आलेल्या या वळणाचं गांभीर्य पाहता कमेंट करत अनेक चाहत्यांनी त्याला धीर दिल्याचं पाहायला मिळालं. असंख्य अनोळखी चाहत्यांनी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाप्रती व्यक्त केलेली सहानुभूती पाहता कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणाऱ्या एका अव्यक्त नात्याचंही दर्शन यावेळी झालं.