करीनाच्या पोस्टवर भडकले युझर्स... 'मालदीवला फिरणाऱ्या कलाकारांना सांग'

करीनाच्या या पोस्टवर ती स्वतःच खूप ट्रोल झाली

Updated: Apr 29, 2021, 03:37 PM IST
करीनाच्या पोस्टवर भडकले युझर्स... 'मालदीवला फिरणाऱ्या कलाकारांना सांग'

मुंबई : देशभरात कोरोना महामारीने नागरिकांना वेढीस धरलं आहे. अशात अनेक कलाकार नागरिकांना सतत घरी राहण्याचं आवाहन करत आहे. स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. या दरम्यान करीना कपूर खानने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी चुकीचा मास्क घालणाऱ्या लोकांवर राग व्यक्त केला आहे. मात्र करीनाच्या या पोस्टवर ती स्वतःच खूप ट्रोल झाली आहे. 

करीनाने पोस्ट केलेल्या या पोस्टवर तिलाच युझर्सने खरी-खोटी सुनावली आहे. युझर्स म्हणतात, या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगण्यापेक्षा तुझ्या मित्र परिवाराला आणि चुलत भावंडांना सांग. जे लोक मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'माझ्यासाठी ही खूप दुःखद गोष्ट आहे. ज्यामध्ये लोकं गांभीर्य ओळखत नाहीत. आपल्या देशात आता जी परिस्थिती आहे. यापुढे तुम्ही बाहेर जाल तेव्हा मास्क योग्य प्रकारे घाला. कोणताही निष्काळजीपणा करताना आपले अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि नर्सचा विचार करा. सगळी अत्यावश्यक सेवा आता कोलमडण्याच्या स्थितीत आहे. आपल्याला ही चेन ब्रेक करायची आहे. भारताला आता आपली गरज आहे. करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.'

अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत की,'हे आम्हाला सांगण्यापेक्षा तुझ्या इतर कलाकारांना सांग. लाजीरवाणं आहे की, तुझ्या सोबतचे कलाकार मालदीवला फिरत आहेत. त्यांना या कडक शब्दात सुनाव.' बॉलिवूडमधील अनेक कलाकार मालदीवला फिरायला गेले. यानंतर मालदीवला भारतातून येणाऱ्या पर्यंटकांना बंदी घालण्यात आली.