लोकप्रिय अभिनेत्याचा कार अपघात

2017 मध्ये देखील झाला होता कार अपघात 

Updated: Nov 14, 2019, 02:31 PM IST
लोकप्रिय अभिनेत्याचा कार अपघात

मुंबई : साऊथ सिनेमातील लोकप्रिय अभिनेता राजाशेखर वरदराजन यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात ते वाचले असून कोणतीही दुखापत झालेली नाही. पण लोकप्रिय अभिनेत्याच्या अपघाताने चाहत्यांना काळजी वाटली आहे. 

मिळालेल्या रिपोर्टनुसार, फ्लॅट टायरमुळे गाडीचा बॅलेन्स गेला आणि ही दुर्घटना घडली. या अपघाताच्यावेळी अभिनेता रामोजी फिल्म सिटीमधून घरी जात होते. ज्यावेळी राजाशेखर यांच्या कारचा अपघात झाला तेव्हा तेथून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी त्यांना बाहेर काढलं. गाडीची काच तोडून त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. तेथील जवळच्या रूग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं. 

राजाशेखर यांनी या अपघातावर जास्त चर्चा नको असल्याचं सांगितलं. त्यांनी म्हटलं की,'हा किरकोळ अपघात असून मी यातून सुखरूप वाचलो आहे.' मात्र पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. या अगोदर 2017 मध्ये देखील त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. 

राजाशेखर हे टॉलीवूडच्या मुवी आर्टिस्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि महासचिव आहेत. तीस वर्षांहून अधिक त्यांच करिअर आहे. त्यांनी आतापर्यंत 80 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. राजाशेखर यांनी तीन वेळा सर्वोत्कृष्ठ कलाकार म्हणून तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आला आहे.