'तेरे नाम'मध्ये पागल मुलीचा रोल करणारी आता दिसते इतकी हॉट

आता दिसते इतकी हॉट

Updated: Apr 25, 2018, 03:10 PM IST
'तेरे नाम'मध्ये पागल मुलीचा रोल करणारी आता दिसते इतकी हॉट title=

मुंबई : बॉलिवूडची दबंग सलमान खान याचा तेरे नाम हा सिनेमा खूपच हिट ठरला होता. सिनेमामधील त्याची हेअर स्टाईल ही खूपच प्रसिद्ध झाली होती. सिनेमामध्ये लीड रोलमध्ये असणारी अभिनेत्री भूमिका चावला देखील यानंतर एका रात्रीत प्रसिद्ध झाली. पण या सिनेमामध्ये आणखी एक पागल मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री आता खूपच हॉट दिसते. तिचे सध्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहे ती अभिनेत्री

सिनेमात पागल मुलीचा रोल करणारी अभिनेत्री आहे रोशनी चौधरी. जिने खूपच छान हा रोल केला. रोशनी चौधरी देखील या सिनेमातून प्रसिद्ध झाली होती. रोशनीने बॉलिवूडमध्ये 30 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण हा सिनेमा तिच्यासाठी खास ठरला होता. या सिनेमानंतर तिला जास्त सिनेमे तर नाही मिळाले पण आज बॉलिवूडचे अनेक कलाकार तिला ओळखतात.

रोशनी चौधरी दक्षिणातील अभिनेत्री आहे. रोशनीने हिंदीसह तमिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. 'तेरे नाम' आणि 'ख़ुशी' सारख्या सिनेमांमध्ये काम करणारी रोशनी 2004 नंतर अचानक गायब झाली. पडद्यावर काम करण्यापेक्षा तिने पडद्यामागे काम करायला सुरुवात केली. दिग्दर्शक म्हणून तीने काम सुरु केलं पण त्यातही तिला मोठं यश मिळालं नाही.