गौरीने शेअर केला सुहानाचा फोटो, फॅन्स म्हणाले, वडिलांची कार्बन कॉपी

सध्या शाहरुख खानची मुलगी सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Updated: Apr 25, 2018, 12:44 PM IST
गौरीने शेअर केला सुहानाचा फोटो, फॅन्स म्हणाले, वडिलांची कार्बन कॉपी

मुंबई : सध्या शाहरुख खानची मुलगी सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुहानाचा हा फोटो तिची आई गौरीने शेअर केलाय. तसेच हा फोटो शेअऱ करताना म्हटलंय, Having the time of your life in your teens ... सोशल मीडियावर या फोटोला चांगली पसंती मिळतेय. एका युजरने तर लिहिलेय की सुहाना आपल्या वडिलांवरच गेलीये. तर दुसऱ्या एका युजरने सुहानाला शाहरुखची कार्बन कॉपी म्हटलेय.

एवढ्या कमी वयात सुहानाच्या बॉडी लँग्वेजमध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसतोय. किंग खानची ही लाडकी सध्या तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्सने सगळ्यांनात इंप्रेस करतेय. गेल्या काही दिवसांमध्ये सुहानाचा मेकओव्हर, लूक आणि तिचा ड्रेसिंग सेन्स बीटाऊनमध्ये चर्चेचा विषय राहिलाय. 

काही दिवसांपूर्वी सुहाना वडिलांसोबत आयपीएलमध्ये कोलकाताच्या संघाला सपोर्ट करताना दिसली होती. स्टेडियममध्ये सुहानासोबत तिचे फ्रेंड्सही होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना लवकरच बॉलीवूडमध्ये येऊ शकते. असंही म्हटलं जातय की सुहानाची बॉलीवूड एंट्रीची जबाबदारी शाहरुखने करणवर सोपवलीये.

बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधीच सुहाना पॉप्युलर झालीये. अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.