मुंबई : 'मी भलेही कमर्शिअल सिनेमा करत नाही पण माझ्या सिनेमांत मोठा संदेश असतो' असे वक्तव्य अभिनेता सलमान खानने केलंय. 1988 मध्ये सलमानने बॉलीवुडमध्ये 'बीवी हो तो ऐसी' मधून अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर त्याने 'मैने प्यार किया', 'करण अर्जून', 'जुडवा', 'बीवी नं 1', 'वॉन्टेड',‘दबंग’ आणि ‘किक’यासारखे अनेक धमाकेदार सिनेमा केले.
'तू खलनायकाची भूमिका का साकारत नाही?' असा प्रश्न सलमान खानला विचारण्यात आला.
त्यावेळी 'मी अशा भूमिका करु शकत नाही मला त्याची भीती वाटते' असं तो म्हणाला. मी जसं सिनेमात वागेन तसं करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे माझा कोणताही सिनेमा चुकीचा संदेश देत नाही. चुकीच्या गोष्टींपासून दूर राहून चांगल्या गोष्टी करणं असा संदेश माझा सिनेमा देतो.' असे तो म्हणाला.
सलमान खानच्या 'भारत' सिनेमात विनोदी कलाकार सुनील ग्रोव्हरदेखील खास भूमिकेत दिसणार आहे.
अली अब्बास दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटिंगमधून वेळ काढून सुनील ग्रोव्हरचा एक फोटो सलमान खानने क्लिक केला आहे.
या फोटोशूटची एक झलक सुनील ग्रोव्हरने ट्विटरवर शेअर केली. या फोटोशूटबाबत लिहताना केवळ फोटोग्राफरकडे बघू नका. हे माल्टा आहे. 'भारत'चं शुटींग करतोय असं म्हणत हा फोटो माझ्याकडे आला की शेअर करेन असेही सुनीलने म्हटले आहे.