शाहीद कपूरचं ट्विटर-इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

अजूनही या पोस्ट शाहीदच्या अकाऊंटवर दिसत आहेत

Updated: Sep 6, 2018, 04:43 PM IST
शाहीद कपूरचं ट्विटर-इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आलेत. शाहीदच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरून भलत्याच पोस्ट येऊ लागल्यानं काही काळ त्याचे फॅन्सही भांबावले होते. हे काम एखाद्या तुर्कस्तानातील व्यक्तीकडून हॅक करण्यात आल्याची शक्यता आहे. कारण, हॅकरनं ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'तुर्की वेळ'...

Add Zee News as a Preferred Source

इतकंच नाही तर हा हॅकर अलाउद्दीन खिलजीचाही फॅन दिसतोय. कारण त्यानं 'पद्मावत' सिनेमात दाखवण्यात आलेल्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेवरही निशाणा साधलाय. 'राजा अलाउद्दीन खिलजी तसा क्रूर आणि जनावरासारखा व्यक्ती नव्हता जसा तुम्हाला दिसला' असं हॅकरनं एका पोस्टमध्ये म्हटलंय.

Shahid kapoor

अजूनही या पोस्ट शाहीदच्या अकाऊंटवर दिसत आहेत. 

Shahid kapoor

या पोस्ट शाहीदच्या केवळ ट्विटरवर नाही तर इन्स्टाग्राम अकाऊंटवरही दिसत आहेत. 

Shahid kapoor

नुकतंच अभिनेत्री कृती सेनन हिचेही सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आले होते... तिचं अकाऊंटही आपणच हॅक केल्याचं हॅकरनं सांगितलंय.  

About the Author