मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरने बॉलीवूडमधील परखड बोलणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री इंडस्ट्रीचं वास्तव अनेकदा उघड करताना दिसते. एका बॉलीवूड अभिनेत्याने एकदा तिला एकट्यात कसं तिला भेटायला सांगितलं याबद्दल तिने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
ईशा कोप्पीकर या चित्रपटात शेवटची दिसली होती. ईशा कोप्पीकर शेवटची हिंदी आणि तमिळ भाषेतील क्राईम थ्रिलर वेब सीरिज धाहनममध्ये दिसली होती. ईशाने 1998 मध्ये एक था दिल एक थी धडकन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि फिजा, प्यार इश्क और मोहब्बत, कंपनी, कांटे, पिंजर आणि दिल का रिश्ता यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तिने 2009 मध्ये हॉटेलियर टिमी नारंगशी लग्न केलं. ईशाला रियाना नावाची सात वर्षांची मुलगी आहे.
ईशाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, ''2000 साली एका प्रसिद्ध निर्मात्याने मला फोन केला होता, ज्यांनी मला सांगितलं होतं की, तुला अभिनेत्याच्या गुड बुकमध्ये असणं आवश्यक आहे. याचा अर्थ मला माहित नव्हता. म्हणून, मी अभिनेत्याला कॉल केला, ज्याने मला त्याला एकटं भेटायला सांगितलं.
स्टाफशिवाय खाजगी मिटींगसाठी त्याने मला बोलावलं होतं, पुढे अभिनेत्रीने सांगितलं की, त्यावेळी त्याच्यावर फसवणूकीचा आरोप केला गेला होता, त्याने मलाला स्टाफशिवाय खाजगी मिटींगसाठी बोलावलं. त्यानंतर मी निर्मात्याला फोन केला आणि सांगितले की मी माझ्या टॅलेंट आणि लूकमुळे ईथपर्यंत आले आहे आणि जर मला चांगलं काम मिळालं तर ते खूप चांगलं होईल आणि त्यानंतर मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.
ईशा कोप्पीकरने पुढे सांगितलं की, अभिनेत्याने जेव्हा तिला कॉल केला तेव्हा तिला एकट्याला भेटण्यास नकार दिला, तरीही मी पूर्णपणे तुटले होते. या घटनेने ती "पूर्णपणे तुटली" आणि माझा भ्रमनिरास झाला.