मुंबई : बॉलिवूड आणि साऊथ सुप्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या अभिनय कारकिर्दीला मल्याळम चित्रपटांमधून सुरुवात केली. पण कालांतराने तिने साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या कामगिरीने अनेकांच्या मनावर राज्य केलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी कोणी नसून आदिती राव हैदरी आहे, जी आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.
हैद्राबादच्या हैदराबादच्या राजघराण्यातील अदिती राव हैदरी हिने अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर स्टारर 'दिल्ली 6' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. या सिनेमाती तिची भूमिका खूपच गाजली आणि या सिनेमातूनच अभिनेत्री घराघरात पोहचली. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अशा भूमिका केल्या, ज्यावर चाहत्यांनी मनापासून प्रेमाचा वर्षाव केला. अभिनेत्रीची फॅन फॉलोइंगही खूप मजबूत आहे. ही अभिनेत्री अकबर हैदरी यांची नात आणि मुहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे, जे आसामचे माजी राज्यपाल देखील होते.
अदितीने तिच्या अभिनय कारकिर्दीत 'रॉकस्टार', 'मर्डर 3' आणि 'फितूर' सारख्या चित्रपटात काम केलं आहे. अभिनयात करिअर केल्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी आदितीने २००९ मध्ये सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं. पण त्यांचे लग्न चार वर्षेही टिकू शकलं नाही. 2013 मध्ये अभिनेत्रीचा घटस्फोट झाला.
आदिती राव हैदरी हिचं आमिर खानसोबत खास नातं आहे. ही अभिनेत्री आमिरची माजी पत्नी किरण रावची कझिन सिस्टर आहे. दोघंही चुलत बहिणी आहे.. अशा परिस्थितीत ती आमिरची नात्याने मेहूणी लागते. मात्र, आता आमिर आणि किरण यांचा काहि दिवसांपुर्वीच घटस्फोट झाला आहे. त्यामुळेच आदितीचंही आमिरशी खास कनेक्शन आहे.
२०१८ मध्ये आलेल्या 'पद्मावत'मध्ये अदितीने अलाउद्दीन खिलजीच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तिच्या या सिनेमातील अभिनयाचं सगळीकडून खूप कौतुकही झालं होतं. या ब्लॉकबस्टर चित्रपटात तिला ही महत्त्वाची भूमिका जया बच्चनच्या सूचनेवरून मिळाली. यासाठी तिने तिच्या एका मुलाखतीत जया बच्चन यांचे आभारही मानले होते. संजय लीला भन्साळींच्या ब्लॉकबस्टर 'पद्मावत'साठी जयाने आपलं नाव सुचवलं होतं. असं तिने मुलाखतीत सांगितलं होतं.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.