मंजिरी फडणीसचं निखळ सौंदर्य पाहून चाहते घायळ; व्हिडिओ व्हायरल

मंजिरी फडणीस आपल्या अभिनय कौशल्यांसह आरस्पानी सौंदर्यासाठी ओळखली जाते. मराठीसह बॉलिवूड सिनेमातही आपला ठसा उमटवणाऱ्या मंजिरीचा फॅशन सेन्सही लक्षवेधी आहे.

Updated: Jul 4, 2022, 06:36 PM IST
मंजिरी फडणीसचं निखळ सौंदर्य पाहून चाहते घायळ; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : मंजिरी फडणीस आपल्या अभिनय कौशल्यांसह आरस्पानी सौंदर्यासाठी ओळखली जाते. मराठीसह बॉलिवूड सिनेमातही आपला ठसा उमटवणाऱ्या मंजिरीचा फॅशन सेन्सही लक्षवेधी आहे.
मंजिरीने नुकतीच शेअक केलेली एक पोस्ट याची नव्याने ग्वाही देते. या व्हिडिओमधील मंजिरीचा लूक कमालीचा ग्रेसफुल आणि आकर्षक दिसत आहे. चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

स्वदेशी सोशल मीडिया मंच कू वर मंजिरीने आपला खास डिझाइन केलेला ड्रेस घालत व्हिडिओ पोस्ट केला आहे. चंदेरी रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन, स्टायलिश बनमध्ये बांधलेले कुरळे केस, त्यातून गालांवर रुळणाऱ्या काही बटा, तसंच लाल लिपस्टिक आणि सौम्य मेकपसह मोजक्या अॅक्सेसरीज असं मंजिरीचं खुललेलं रुप या व्हिडिओत पहायला मिळतं आहे.

'पॉवरब्रॅन्ड्स फिल्म जर्नलिस्ट अवॉर्ड शो' या अवॉर्ड शोसाठी मंजिरीने ही वेशभूषा केली आहे. फॅशन डिझायनर एमी बिलिमोरियाने तिचा गाऊन डिझाइन केला असून सविता नलावडेने तिची हेअर स्टाईल केली असल्याचा खास उल्लेख मंजिरीने या पोस्टमध्ये केला आहे.

सध्या मंजिरी चर्चेत आहे ते तिच्या 'मिया बिवी और मर्डर' या खास वेब सिरीजमुळे. ही सिरीज एमएक्स प्लेअरवर एक्सक्लूझिव्ह रुपात उपलब्ध आहे. रहस्य, रोमांच असा मसाला भरलेल्या या सिरीजमध्ये मंजिरी फडणीससह राजीव खंडेलवाल हा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. राजीव यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मंजिरी पत्नीची भूमिका निभावत असून तिच्या व्यक्तीरेखेचं नाव प्रिया आहे.