अरे देवा, देखण्या कार्तिक आर्य़नच्या चेहऱ्याचा हा काय अवतार? 

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

Updated: Jan 10, 2022, 06:24 PM IST
अरे देवा, देखण्या कार्तिक आर्य़नच्या चेहऱ्याचा हा काय अवतार?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो दररोज त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. जे फोटो पाहून चाहते स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. कार्तिकच्या पोस्टवर त्याचे चाहते अनेकदा मजेशीर कमेंट करतात. त्यामुळे त्याची पोस्ट व्हायरल होते. आज आम्ही तुमच्यासोबत कार्तिक आर्यनचा असा एका फोटो शेअर करणार आहोत जो पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. एवढंच नाही तर कार्तिकच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

कार्तिक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडलेला असतो. कार्तिकने काही दिवसांपूर्वी चेहऱ्यावर हिरवा फेसमास्क लावलेला एक फोटो शेअर केला होता. ज्यावर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या. कार्तिकच्या या फोटोची चाहत्यांनी खिल्ली उडवली.

युजर्सने केल्या मजेदार कमेंट
स्वतःचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत कार्तिकने लिहिलं, फक्त चुकीचं कॅप्शन. यावर यूजर्सने मजेशीर कमेंट्स केल्या आहे. एका युजरने लिहिलं, मेहंदी लावून लक्षात आलं, अरे, मी तर मुलगा आहे. दोन मिनिटांत आलो.. तर दुसर्‍या यूजरने लिहिलं, जर नातं चुकीच्या ठिकाणी गेलं असेल तर खेद वाटते. त्यात चेहरा काळा करण्याची काय गरज आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर एका यूजरने लिहिलं, हा माणूस थोडासा कार्तिक आर्यनसारखा दिसतो. तर दुसर्‍याने लिहिलं, मेहंदी चेहऱ्यावर लावली आहे ती हातांना लावा. कार्तिकच्या या पोस्टला आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.