मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. दरम्यान सुशांतची आत्महत्यानसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सीबीआय कसून चौकशी करत आहे. सुशांतच्या आत्महत्येमागचं नक्की कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिल्लीतील एम्स रुग्णालय करत आहे. एम्स रुग्णालयाने सुशांतच्या आत्महत्येचा अंतिम रिपोर्ट सीबीआयच्या हाती दिला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
सुशांत आत्महत्ये प्रकरणी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.
सोमवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये एम्स डॉक्टरांच्या समितीने आभ्यासात समोर आलेल्या सर्व बाजू सीबीआयकडे सोपवल्याची माहिती सूत्रांनी एनडीटीव्हीला दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचे मत म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
सुशांत सिंह राजपूतने १४ जुन रोजी त्याच्या वांद्रे राहत्या घरी गळफास घेत या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूनंतर ही आत्महत्यानसून हत्या असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी व्यक्त केला. सध्या याप्रकरणी सीबीआई (CBI), ईडी (ED), एनसीबी (NCB) या तीन केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे.