आई झाल्यानंतर अनुष्का शर्माचा पहिला फोटो

सोशल मीडियावर तिचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.   

Updated: Feb 7, 2021, 06:22 PM IST
आई झाल्यानंतर अनुष्का शर्माचा पहिला फोटो title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अनुष्काने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करत तिचं नाव देखील जाहीर केलं. विरूष्काच्या नव्या जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायम उत्सुक असतात. तर ही बातमी आनुष्काच्या चाहत्यांसाठी आहे. आनुषकाने आई झाल्यानंतर पहिल्यांदा सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. 

सध्या अनुष्काचा हा नव्या अंदाजातील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्य़े ती अत्यंत फिट दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शन देखील दिलं आहे. 'माझ्या आवडतीचा ड्रेस कोड' असं तिने लिहलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

विराट आणि आनुष्काने त्यांच्या मुलीचे नाव वामिका ठेवलं आहे. वामिका म्हणजे देवी दुर्गा. वामिका आई दुर्गेला म्हटलं जातं. शिवाय महादेवाची साथी म्हणजेच जीवनसंगिनी म्हणून देखील संबोधलं जातं. महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मामध्ये डाव्या बाजूच्या हाताला जीवनसाथी उभी राहते. 

शिवाय वामिका' याचा अर्थ 'शक्ती' आणि 'ताकद' असा देखील होतो. यामुळे विरूष्का आणि त्यांच्या लेकीकरता हे खूप सकारात्मक नाव असणार आहे. त्याचप्रमाणे वामिकाचा तिच्या वडिलांशी म्हणजे विराट कोहलीशी खास बाँड असणार आहे.