मुंबई : हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जेम्स कॉन यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं. 'द गॉडफादर' आणि Brian's Song' यांसारख्या एकापेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. जेम्स कॉन यांनी अनेक वर्ष हॉलिवूडमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांनी अनेक दशके हॉलीवूड उद्योगावर राज्य केले. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, जेम्स यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. कुटुंबियांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ' 6 जुलै रोजी संध्याकाळी जिमी यांचं निधन झाले. आम्ही चाहते आणि शुभचिंतकांच्या भावनांचा आदर करतो.'
It is with great sadness that we inform you of the passing of Jimmy on the evening of July 6.
The family appreciates the outpouring of love and heartfelt condolences and asks that you continue to respect their privacy during this difficult time.
End of tweet
— James Caan (@James_Caan) July 7, 2022
'कठीण काळात कुटुंबाच्या गोपनीयतेची काळजी घ्या.' असं म्हणत कुटुंबाने जेम्स यांच्या चाहत्यांना विनंती केली आहे. जेम्स यांच्या निधनाने संपूर्ण हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
जेम्स यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहे. जेम्स यांच्या काही सर्वोत्कृष्ट सिनेमांबद्दल सांगायचं झाल तर, त्यांनी 'काउंटडाउन', 'द रेन पीपल', 'फनी लेडी' सारख्या सिनेमांमध्ये काम केले. 2021 मध्ये 'क्वीन बीज' या रोमँटिक-कॉमेडी सिनेमात ते शेवटचे पडद्यावर दिसला होता.