'कपिल शर्मा शो' फेम Sugandha Mishraचा गुपचूप साखरपूडा; लवकरच घेणार सातफेरे

 विनोदवीर सुगंधा मिश्रने बॉयफ्रेंड संकेत भोसलेसह साखरपुडा केला आहे. 

Updated: Apr 18, 2021, 08:25 AM IST
'कपिल शर्मा शो' फेम Sugandha Mishraचा गुपचूप  साखरपूडा; लवकरच घेणार सातफेरे

मुंबई : 'द कपिल  शर्मा शो' मधील कलाकारांची विनोदबुद्धी प्रत्येकाला पोट धरून हासण्यास भाग पाडतेच. शोमधील कलाकारांची नावं  आणि त्यांचं कौशल्य तर प्रेक्षकांच्या मनात आहे. तर शोमधील विनोदवीर सुगंधा मिश्रने बॉयफ्रेंड संकेत भोसलेसह साखरपुडा केला आहे. सुगंधा साखरपुड्याचे काही फोटो सोशलव मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या तिने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@sugandhamishra23)

सुगंधाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'फोरेव्हर' असं लिहीलं आहे. तर आता साखरपुड्यानंतर संकेत आणि सुगंधाचे चाहते त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहे. सुगंधाच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि मित्रमंडळाने शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये दोघेही अत्यंत सुंदर दिसत आहेत. 

सांगायचं झालं तर संकेत आणि सुगंधा काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शिवाय अनेक शोमध्ये त्यांनी एकत्र काम देखील केलं आहे. पण दोघांनीही त्यांच्या नात्याचा कधीही खुलासा केला नाही. त्यांनी कायम त्यांचं नातं गुपित ठेवलं. काही काळापूर्वी सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी सुनील ग्रोव्हरच्या कॉमेडी शो गँग्स ऑफ फिल्मिस्तानमध्ये काम केले होते.