Neil Nitin Mukeshला कोरोनाची लागण; कुटुंबातील अन्य सदस्यही कोरोनाच्या विळख्यात

बॉलिवूडदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडाला आहे. 

Updated: Apr 18, 2021, 07:45 AM IST
Neil Nitin Mukeshला कोरोनाची  लागण; कुटुंबातील अन्य सदस्यही कोरोनाच्या विळख्यात

मुंबई : जानेवारी , फेब्रुवारी महिन्यात मंदावलेली कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. कोरोना व्हायरसची ही दुसरी लाट अत्यंत भयंकर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूडदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडाला आहे. प्रत्येक दिवशी बॉलिवूडमधून कोरोना रूग्णांची माहिती  येते. आता अभिनेता  निल नितीश मुकेश कोरोनाच्या जाळ्यात अडकला असून त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही  कोरोनाची लागण झाली आहे. 

खुद्द निलने कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'मला तुम्हा सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत. कोरोना व्हायरसचं गांभीर्य असू द्या.' असं निलने ट्विटमध्ये म्हटलं आहे. निलसह त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या निल घरीच क्वारंटाईअसून कोरोना नियमांचं पालन करत आहे. 

सोनू सूदला कोरोनाची लागण
अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत सोनू सूदने स्वतः ही माहिती दिली आहे. सोनूने स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात उपचार घेत आहे. 

सोनू सूदने काय म्हटलंय ट्विटमध्ये? नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे ट्वीट सोनू सूद याने केले आले.