VIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

Archana Puran Singh and Krishana Abhishek: कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक गमती जमती या घडताना दिसतात त्यामुळे सगळीकडे एकच हशा पिकतो. सध्या या कार्यक्रमाचा एक लेटेस्ट व्हिडीओ (TKSS Latest Video) समोर आला आहे. ज्यात कृष्णा अभिषेक हा अर्चना पूरण सिंगची खेचताना दिसतो आहे. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 28, 2023, 01:13 PM IST
VIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?  title=
May 28, 2023 | The Kapil Sharma Show कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगला टोमणा मारतो की त्या कार्यक्रमातील उरलेलं जेवण हे घरी घेऊन जातात. हा एक विनोदी टोमणा असतो. यावेळी कपिल शर्माच्या शोमध्ये गायक आणि गायिका हजेरी लावणार आहेत. (Photo: File Photo)

The Kapil Sharma Show: अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) या 'द कपिल शर्मा शो'मधून आपल्याला दिसत आहे. हा शो यावर्षी नव्या जोमाने सुरू झाला आहे. सध्या या शोची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. दर एपिसोडला वेगवेगळे कलाकार या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यावेळी कपिल शर्माच्या या शोमधून लोकप्रिय गायक-गायिका हजेरी लावणार आहेत. शंकर महादेवन (Shankar Mahadevan in Recent Kapil Sharma Show Episode) यांच्यासह यावेळी लोकप्रिय गायकांची हजेरी लागणार आहे.

काही दिवसांपुर्वी या शोमधून ज्येष्ठ लेखिका सुधा मुर्ती, (Sudha Murthy) अभिनेत्री रविना टंडन आणि ऑस्कर विजेत्या दिग्दर्शिका गुनीत मोंगा यांनी हजेरी लावली होती. हा एपिसोड बराच गाजला होता. आता प्रेक्षकांना या नव्या एपिसोडची उत्सुकता आहे. सध्या या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

या नव्या प्रोमोमध्येही (Latest Promo of The Kapil Sharma Show) तुम्हाला विनोद आणि टोमणे ऐकायला मिळणार आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की अर्चना पुरण सिंग आपल्या त्या सीटवर बसलेल्या आहेत. कपिल हा आलेल्या पाहूण्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारायला सुरूवात करतो. तेवढ्यात कपिलच्या शोमधील कलाकारांच्या स्कीटला सुरूवात होते. कृष्णा अभिषेक यावेळी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या गेटअपमध्ये एन्ट्री घेतो. तेवढ्यात तो त्यांच्या आवाजात कपिलला म्हणतो की, ''कपिल, तूला सांगितलं होतं ना की जास्त गाऊ नको. पाहा किती गायक आले इथे!'' या त्याच्या जोकवर सगळेच जण हसतात. 

हेही वाचा - 'लोग क्या कहैंगे' याचा विचार मोडत, वयाचे बंधन जुगारत 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी हृदयाचे ऐकले अन्...

तेवढ्यात तो अर्चना पूरण सिंगकडे बोट करतो आणि म्हणतो, ''अर्चनाजी तुमच्या घरी लवकर जेवण बनवायला सांगा आणि येथे ते जेवण पाठवायला सांगा.'' मग कीकू शारदा म्हणते, ''काय, आज सर्व गेस्टसाठी अर्चनाजी जेवण आणणार आहेत?.'' तेव्हा तो गमतीत टोमणा मारतो की, ''अरे, पाहा किती गेस्ट आले आहेत आपल्याकडे, आता अर्चना पूरण सिंग शोमधील उरलेलं जेवण घरी कशा काय घेऊन जातील?'' त्याच्या या टोमण्यावर सगळेच जण हसतात आणि खुद्द अर्चना पूरण सिंहही. त्यामुळे सगळीकडेच हशा, टाळ्या, शिट्या आणि कृष्णा अभिषेकचे विनोदी टोमणे असे समीकरण बनून जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कपिल शर्माच्या या भागात गायिका आकृती कक्कड, शंकर महादेवन, शानसोबत अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. काही कारणांमुळे कृष्णा अभिषेकनं हा शो सोडला होता. त्याला हवे तसं मानधन मिळत नसल्याचे कारण त्यानं सांगितले होते. कपिल शर्मानं जुन्याच कलाकारांसह हा शो नव्यानं आणला आहे. काही कलाकार या शोमधून बाहेर पडले आहेत.