21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी केलं 'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं लग्न!

Actress Snehal Rai Married to Politician : ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या अनेक मालिकांमध्ये दिसते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या दोघांची भेेट एका कार्यक्रमात झाली असून त्यावेळी सुत्रसंचालन करत असताना तिनं त्या नेत्याशी नाव चुकीचे घेतले होते. 

दिक्षा पाटील | Updated: May 28, 2023, 12:48 PM IST
21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी केलं 'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं लग्न!  title=
(Photo Credit : Snehal Rai Instagram)

Actress Snehal Rai Married to Politician : प्रेमात आपण कोणत्याही इतर गोष्टींना महत्त्व देत नाही. समोरची व्यक्ती लहान आहे की मोठी, श्रीमंत आहे की गरीब कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. प्रेम हे कोणत्याही व्यक्तीसाठी या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं असतं त्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. सगळ्यांची लाडकी प्रियांका चोप्रानं देखील तिच्या हून लहान असणाऱ्या निक जोनसशी लग्न केलं आहे. नुकतंच उदाहरण घ्यायचं झालं तर अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. आता एक लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. छोट्या पडद्यावरील स्नेहल राय चर्चेत आली आहे. स्नेहल राय ही  ‘इश्क का रंग सफेद’ या मालिकेसाठी ओळखली जाते. स्नेहलनं तिच्या लग्नाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. 

स्नेहलनं नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत स्नेहलनं लग्नाच्या तब्बल 10 वर्षांनंतर एक मोठा खुलासा केला आहे. वयाच्या 23 व्या स्नेहलनं लग्न केलं होतं. स्नेहल याविषयी बोलताना म्हणाली की, "माझ्या लग्नाविषयी मी काही लपवून ठेवलं नाही. एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे माझ्या खासगी आयुष्याबाबत मला बोलायला आवडतं नाही किंवा मी बोलणं टाळते. लग्नानंतर माझ्या करिअरवर काही परिणाम झालेला नाही."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नानंतर स्नेहलच्या करिअर कसं होतं त्याविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “लग्नानंतर रात्री मी घरी उशीरा आली किंवा उशीरा कोणाचा फोन आला की, माझ्या पतीला काळजी वाटायची. पण अभिनय क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात कशाप्रकारे काम सुरु असतं हे आता त्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांना आता चिंता वाटत नाही." 

हेही वाचा : Anushka Sharma बॉलिवूडमधून घेणार ब्रेक? म्हणाली "मला अभिनय आवडतो पण..."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे स्नेहलचा पती?

राजकीय येते माधवेंद्र राय यांच्याशी स्नेहलनं लग्न केलं. तर स्नेहल ही माधवेंद्र यांच्याहून 21 वर्षे लहान आहे. करिअरच्या सुरुवातीला सुत्रसंचालक म्हणून काम करणाऱ्या स्नेहल आणि माधवेंद्र यांची पहिली भेट एका कार्यक्रमात झाली आहे. या कार्यक्रमात स्नेहलनं सुत्रसंचालन केलं होतं. सुत्रसंचालन करत असताना स्नेहलनं माधवेंद्र यांचं नाव अडखळत घेतलं होतं. त्यामुळे स्नेहल ही माधवेंद्र यांच्या लक्षात राहिली होती. त्यात त्या दोघांची रिटर्न फ्लाइट देखील एकच होती. त्यानंतर दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मग काय तर त्यांचे एकमेकांवर प्रेम झाले. तर आता त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली असून ते आनंदानं राहत आहेत.