'द लंचबॉक्स'च्या कास्टिंग दिग्दर्शकाचं निधन, बॉलिवूडकरांनी व्यक्त केलं दुःख

बॉलिवूड कलाकारांना मोठा फटका 

Updated: Jun 8, 2021, 10:43 AM IST
'द लंचबॉक्स'च्या कास्टिंग दिग्दर्शकाचं निधन, बॉलिवूडकरांनी व्यक्त केलं दुःख  title=

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शक सहर अली लतीफ यांचं निधन झालं आहे. सोमवारी किडनी निकामी झाल्याने सहर यांनी अखेरचा श्वास घेतला. सहर यांच्या अचानक जाण्यामुळे बॉलिवूडकरांनी दुःख व्यक्त केलं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केला आहे. ( The Lunchbox Casting Director Seher Aly Latif Dies in Mumbai) 

राजकुमार राव, हुमा कुरैशी, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, निमरत कौर, सान्या मल्होत्रा, नोरा फतेही यासारख्या अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे. सहर यांनी द लंचबॉक्स, द बेस्ट एग्जॉटिक मैरीगोल्ड होटल, शकुंतला देवी, दुर्गामती: द मिथ, मॉनसून शूटआउट सारख्या सिनेमांकरता कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. 

कलाकारांनी व्यक्त केल्या भावना 

अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वरा भास्करने जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, सहर मी तुला कायमच चिढवायचे. पण मला हे नव्हतं कळत की माझं तुझ्यावर असलेलं प्रेम मी कसं व्यक्त करू? स्वराने सहरच्या चांगल्या स्वभावाचं कौतुक केलंय. स्वरा सहर यांच्या जाण्याने खूप दुःखी झाली आहे.