शिल्पा शेट्टीला या अभिनेत्याने धोका दिल्यानंतर आयुष्यात अशी झाली राज कुंद्राची एन्ट्री

शिल्पाचं फिल्मी करियर तर चर्चेत होतं आणि आजही आहे, पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील चर्चा रंगली होती.

Updated: Jun 8, 2021, 09:40 AM IST
शिल्पा शेट्टीला या अभिनेत्याने धोका दिल्यानंतर आयुष्यात अशी झाली राज कुंद्राची एन्ट्री

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 90च्या दशकात बॉलिवूड गाजवला होता. तिच्या चाहत्यांची संख्या आजही तितकीचं मोठी आहे. आज शिल्पा यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. पण या प्रवासात तिला खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता. संकटांचा सामना शिल्पाने केलाचं त्याचं तिला गोड फळ देखील मिळालं. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण शिल्पाला लोकप्रियता मिळाली 'धडकन' चित्रपटाच्या माध्यमातून. 

शिल्पाचं फिल्मी करियर तर चर्चेत होतं आणि आजही आहे, पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील चर्चा रंगली होती. 'धडकन' चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमार आणि शिल्पाच्या जोडीला चाहत्यांनी चांगलचं डोक्यावर घेतलं. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या. दोघांमध्ये प्रेमाचा गुलाब बहरला तो म्हणजे 'मैं खिलाडी तू अनाजी' चित्रपटाच्या सेटवर.

अनेक दिवस दोघांच्या नात्याची चर्चा रंगत होती. ज्या वेगाने शिल्पा - अक्षयच्या नात्याबद्दल सर्वांना कळत होतं. त्याचं वेगाने त्यांचं ब्रेकअप देखील झालं. अक्षयने शिल्पाला फसवलं आणि ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं. त्यानंतर शिल्पाला मोठा धक्का बसला. तेव्हा एका मुलाखतीत शिल्पाने नाराजी देखील व्यक्त केली. 

आयुष्यात या मोठ्या संकटाचा सामना केल्यानंतर बिझनेस पार्टनरच्या रूपात शिल्पाच्या आयुष्यात राज कुंद्राची एन्ट्री झाली. शिल्पा पहिल्या नजरेतचं राज यांच्या प्रेमात पडली. पण राजचं लग्न झालं आहे, असं काही दिवसांनी शिल्पाला कळालं. नंतर शिल्पाला राज कुंद्रा यांच्याकडून समजले की ते आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेत आहे.

दरम्यान, एका मुलाखतीत राजने शिल्पावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. राज आणि शिल्पाला दोन मुलं आहेत. शिल्पा कायम पती आणि मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.