चोरी की... शाहरुख खानच्या घरात मध्यरात्री घुसलेल्या त्या 2 व्यक्ती कोण? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात (Shahrukh Khan bungalow Mannat) गुरूवारी रात्री 9.30 च्या सुमारास दोन युवक घुसले. या दोघांनी मन्नतची भिंत फोडली आणि शाहरुखच्या बंगल्यात प्रवेश केला.

Updated: Mar 3, 2023, 09:13 PM IST
चोरी की... शाहरुख खानच्या घरात मध्यरात्री घुसलेल्या त्या 2 व्यक्ती कोण? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान गेल्या दोन दशांकहून अधिक काळ चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. शाहरूख खानचे (Shahrukh Khan) चाहते देशभरात आहेत. शाहरुखने जे यश मिळवलं आहे, त्याने घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. शाहरुखचे चाहते त्याला भेटण्यासाठी काहीही करू शकतात. असे दोन युवक होते ज्यांनी शाहरुख खानला भेटण्यासाठी थेट मन्नत (bungalow Mannat) ची भिंत तोडली आहे. ही घटना गुरूवारी घडली असून पोलिसांनी या दोन युवकांना अटक केले आहे. 

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात (Shahrukh Khan bungalow Mannat) गुरूवारी रात्री 9.30 च्या सुमारास दोन युवक घुसले. या दोघांनी मन्नतची भिंत फोडली आणि शाहरुखच्या बंगल्यात प्रवेश केला. हे दोघेही शाहरुख खानचे चाहते असल्याची माहिती मिळत आहे. पण परवानगीशिवाय खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याबद्दल पोलिसांनी या दोघांवरही खटला नोंदविला आहे. 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान मन्नतमध्ये घुसलेल्या दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दोघंही गुजरातमधील भरूचचे रहिवासी आहेत. बुधवारी रात्री मन्नत कंपाऊंड येथील बंगल्यात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना पकडलं. पोलिसांच्या चौकशीत त्याने एवढंच सांगितलं की, त्याला शाहरुख खानला भेटायचं होतं, म्हणून तो त्याच्या घरात घुसला. पोलीस या घटनेचा सर्वच बाजूंनी तपास करत आहेत.

दोन्ही आरोपींनी प्राथमिक चौकशीत सांगितलं की ते शाहरुखचे चाहते आहेत आणि त्याला भेटण्यासाठी ते घरात घुसले होते, मात्र पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.

दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत
आज मुंबई पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केलं आणि सांगितलं की, आरोपी मुंबईत कसे पोहोचले, मुंबईत आल्यानंतर ते कोणाला भेटले, फोनवर कोणाशी बोलले, फक्त शाहरुखलाच भेटण्याचा त्यांचा हेतू होता, याचा तपास करत आहोत. त्यांचे सीडीआर तपासण्यासाठी. पोलिसांनी आरोपींना 2 दिवसांची कोठडी मागितली होती, न्यायालयाने एक दिवसाची कोठडी दिली आहे.

शाहरुखच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याचा 'पठाण' हा सिनेमा आताच प्रदर्शित झाला. या सिनेमात तो जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणसोबत काम केले. तर या सिनमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याने केले आहे. याशिवाय शाहरुख अलावा एटलीच्या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा, नयनतारा असणार आहेत. तसेच किंग खान सलमानच्या 'टायगर ३' सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.