राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'वीर मुरारबाजी'मध्ये झळकणार

‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

Updated: Apr 15, 2024, 03:35 PM IST
राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'वीर मुरारबाजी'मध्ये झळकणार title=

मुंबई : जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली 'रामायण' ही मालिका प्रचंड गाजली. विशेषतः राम आणि सीतेच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले. या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा पटकावली. या राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. 

‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्यदिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडणारा ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास बघता यावा यासाठी आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ही चित्ररूपी चळवळ उभारली आहे. 

‘वीर मुरारबाजी’चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे. उच्च निर्मितीमूल्य, दर्जेदार तंत्रज् आणि त्याला असलेली उत्तोमोत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. 

निर्माता-दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या 'रामायण' या लोकप्रिय मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दीपिका चिखलिया 'वीर मुरारबाजी' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रामायणातील राम अरुण गोविल हे शाहजी भोंसलेंच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की, 'धरतीपुत्र नंदिनी' या मालिकेतून निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, मला सुरुवातीला अभिनय क्षेत्रात यायचं नव्हतं. कारण मी निर्मीती क्षेत्रात रुळली होती. निर्मिती ही खूप मोठी जबाबदारी आणि यानंतर मी अभिनय क्षेत्रात आले. कारण वाहीनीने ठरवलं की, मी अभिनय करावा. नंतर मी विचार केला की, मी एकावेळी दोन गोष्टी करु शकणार नाही. मी निर्मिती आणि अभिनय एकत्र करू शकणार नाही, हा चुकीचा निर्णय ठरेल. मात्र आता मला खूप छान वाटतं. जस-जसा गोष्टीचा विस्तार होत गेला आता एक्टिंग करायला खूप मज्जा येतेय. जर फक्त प्रोड्यूसर असते तर आठवड्यातून एक किंवा दोन दिवस आले असते. आता एक्टिंगमुळे महिन्याचे २५ दिवस यावच लागतं.  रामायण या मालिकेनंतर दीपिका चिखलिया आणि अरुण गोविल यांची जोडी 'नोटिस' या चित्रपटाव्यतिरिक्त 'वीर मुरारबाजी' या चित्रपटातही दिसणार आहे.