अक्षय कुमार - टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टीझर 'या' दिवशी येणार भेटीला!

गेले अनेक दिवस अक्षय कुमार आणि टायगरच्या  "बडे मियाँ और छोटे मियाँ"च्या चर्चा जोरदार सुरू आहे. बरेच दिवस प्रेक्षक या सिनेमाची झलक पाहण्यासाठी आतूर आहेत. यातच आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Updated: Jan 21, 2024, 06:38 AM IST
अक्षय कुमार - टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टीझर 'या' दिवशी येणार भेटीला! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॉलीवूडचा यंग अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफचा "बडे मियाँ और छोटे मियाँ"च्या चर्चा जोरदार सुरू आहेत आणि अशातच या चित्रपटाचा टीझर येणार असल्याचा बातम्या समोर येत आहेत. 2024 च्या ईदला हा बहुचर्चित चित्रपट येणार आहे. सूत्रानुसार  24 जानेवारी 2024 रोजी एक भव्य टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा टीझर केवळ एक झलक नाही तर ‘बडे मियाँ और छोटे मियाँ’च्या सिनेमॅटिक विश्वात खळबळ माजवणार आहे. खिलाडीसह अक्षय कुमार आघाडीवर असून सर्वात तरुण अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफसह या बहुप्रतीक्षित चित्रपट घेऊन येणार असून तरुण स्टारचा "टायगर इफेक्ट" सगळयांना अनुभवयाला मिळणार आहे. 100 सेकंदांहून जास्त यात व्हिज्युअल ट्रीट असणार असून उच्च-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सचे कॅरेक्टर बिल्ड अप बघायला मिळणार आहेत.

जस जसा टीझर लॉन्च जळव येत आहे तस-तसा   "टायगर इफेक्ट" बघायला मिळणार आहे. टायगर या चित्रपटासाठी चाहते गेले अनेक दिवस खूप उत्सुक आहे."बडे मियाँ आणि छोटे मियाँ"च्या पलीकडे टायगर श्रॉफचा सिनेमॅटिक प्रवास रोहित शेट्टीच्या "सिंघम अगेन" आणि रोहित धवन दिग्दर्शित "रॅम्बो" सोबत Marflix Pictures च्या अंतर्गत हा चित्रपट येणार आहे. चाहते अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या अॅक्शन एंटरटेनर चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून बडे मियाँ छोटे मियाँची चर्चा जोरदार सुरू आहे. काही दिवसांपुर्वीच म्हणजेच (५ मे २०२३) ला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. 

पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमध्ये अॅक्शन हिरो म्हणून ओळखले जातात. अशा परिस्थितीत अक्षय आणि टायगर एका कमर्शियल चित्रपटात एकत्र येणं पूर्णपणे मनोरंजक असणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा बहुप्रतिक्षित अॅक्शन-पॅक्ड चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रत्येकजण या चित्रपटाची वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. या चित्रपटाचा टीझरही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.