अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे एकत्र; तुम्ही 'या' नव्याकोऱ्या चित्रपटाचा टिझर पाहिलात का?

विनोद कांबळे दिग्दर्शित चित्रपट 'कस्तुरी' हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अनुराग कश्यप व नागराज मंजुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे. 

Updated: Nov 26, 2023, 01:31 PM IST
अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे एकत्र; तुम्ही 'या' नव्याकोऱ्या चित्रपटाचा टिझर पाहिलात का? title=

मुंबई : विनोद कांबळे दिग्दर्शित चित्रपट 'कस्तुरी' हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अनुराग कश्यप व नागराज मंजुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे. टीझरमध्ये दोन शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर शाळेत मिळणाऱ्या बक्षिसाचे आकर्षण दिसत आहे. तसेच या चित्रपटातमध्ये समर्थ सोनवणेला सफाई काम व पोस्टमार्टम करणाऱ्या मुलाच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे या कामामुळे वर्गात त्याला किती तुच्छ वागणूक मिळत आहे हे समोर आलेल्या टीझरमध्ये दिसत आहे.

कस्तुरी हा सिनेमा सनी चव्हाण नावाच्या एका पोस्टमार्टम करणाऱ्या  मुलाच्या सत्य घटनेवर आधारितअसून बार्शी मधील ही कथा आहे. आपल्या अंगाचा वास येऊ नये म्हणून कस्तुरीच्या अत्तराचा शोध घेणाऱ्या दोन मित्रांची धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

खरं पाहायला गेलं तर समाजातील एक पारंपारिक काम करणाऱ्या मुलाला पारंपारिक काम करण्यासाठी शिक्षण सोडून द्यावे लागते. कोवळ्या स्वप्नांना नवीन पालवी फुटत असताना ही मुलं आर्थिक व सामाजिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. आपली ओळख आपल्या कामावर ठरत नाही ती आपण काय काम करतो आणि कशाप्रकारे काम करतो यावर ठरते. शिक्षण हे असे माध्यम आहे की ज्यातून माणसात सकारात्मक परिवर्तन घडून येते. पारंपारिक कामामुळे शिक्षणापासून दूर ढकलले गेलेल्या परंतु शिक्षणाची ओढ असणाऱ्या पोस्टमार्टम करणाऱ्या सत्य घटनेवर आधारित अशा एका मुलाची गोष्ट आहे.

याच गोष्टीने थेट अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे यांना प्रभावित केलं असून चित्रपटाला अनुराग कश्यप व नागराज मंजुळे प्रस्तुत करत आहेत. दोघांनी ही अनेक मुलाखतीमध्ये कस्तुरी चित्रपटाचे कौतुक केलं आहे. तसेच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचाचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. विनोद कांबळी दिग्दर्शित हा चित्रपट आता 8 डिसेंबर सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला कस्तुरी हा हिंदी चित्रपट  8 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. इनसाइट फिल्मची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप हे प्रस्तुत करत आहेत. विनोद कांबळे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. एक उल्लेखनीय बाब अशी की चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, मुख्य कलाकार यांचा हा पहिला चित्रपट असूनही थेट राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत बाजी मारली.या सोबतच हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासहित अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये निवडला गेला होता. तिथेही कस्तुरी या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आलं तसेच चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.