'41 वर्षांचा झालोय, आता कंबर दुखते...'; वाढत्या वयामुळे रणबीर कपूरकडून होत नाही 'हे' काम

Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती त्यावेळी त्यानं आता 41 वर्षांचा झाला असून त्याची कंबर दुखते आणि त्याच्याकडून कोणतं काम होतं नाही याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 26, 2023, 02:41 PM IST
'41 वर्षांचा झालोय, आता कंबर दुखते...'; वाढत्या वयामुळे रणबीर कपूरकडून होत नाही 'हे' काम title=
(Photo Credit : Social Media)

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या बॉबी देओलसोबत त्याच्या 'अॅनिमल' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीर आणि बॉबी देओल हे नुकतेच मुंबईत त्यांच्या चित्रपटाच्या म्यूजिक लॉन्चला पोहोचले होते. त्यावेळी त्या दोघांनी मिळून रणबीरचा 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटातील 'बदतमीज दिल' या गाण्याची हूक स्टेप केली. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याचा डान्स झाल्यानंतर रणबीरनं त्याच्या चाहत्यांकडे एक विनंती केली आहे. 

रणबीर कपूरनं 'बदतमीज दिल' या गाण्यावर डान्स केल्यानंतर चाहत्यांकडे विनोद करत एक विनंती केली आहे. जसं गाणं थांबलं, रणबीर म्हणाला, 'मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, हे गाणं 2013 मध्ये प्रदर्शित झालं होतं. पण मी कुठेही गेलो की तिथे हे गाणं माझ्या मागे येतं. आता मी 41 वर्षांचा झाला आहे, आता माझ्याकडून हे नाही होतं. माझी कंबर दुखते.' इतकंच नाही तर पुढे रणबीर हे देखील म्हणाला की तो इव्हेंट मॅनेजरला देखील हे सांगणार आहे की यापुढे हे गाणं लावू नका. माझं वय होतंय आणि त्यामुळे स्लो गाणं लावा. रणबीरनं केलेलं हे वक्तव्य ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे चाहते हसू लागतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याशिवाय रणबीरनं बॉबी, काजोल आणि मनीषा कोयरालाच्या 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुप्त : द हिडन ट्रूथ' या चित्रपटातील 'दुनिया हसीनों का मेला' या गाण्याची हुकस्टेप करण्याचा प्रयत्न केला आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्यात खूप चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : 50 वर्षांची मलायका आहे सिंगल, अर्जुनशी झाला ब्रेकअप? फराह खानचा अभिनेत्रीच्या नात्यावर खुलासा

रणबीर कपूर सध्या 'अॅनिमल' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाले आहेत. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदाना देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉबी देओल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी विकी कौशलचा सॅम बहादुर हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवरून एक वेगळीच लढा आपल्याला पाहायला मिळणार आहे.