मुंबई : बॉलीवूडच्या जगात प्रत्येक फ्रायडेला चित्रपटाचं आणि कलाकारचं भवितव्य ठरत. बॉक्स ऑफिसच्या इन्कमवर प्रत्येक कलाकार आणि चित्रपट यांची प्रतिमा ठरते. जरी टायगर श्रॉफचा त्याचा अलीकडील चित्रपट "गणपथ" ने फार अपेक्षित कमाई केली नसली तरीही त्याची कलाकारी कारकिर्दी ही बॉक्स ऑफिस पलिकडे आहे.
अभिनेता टायगर श्रॉफ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो कधी त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेत्याकडे चित्रपटांची रांग आहे. लवकरच अभिनेता 'सिंघम अगेन'मध्ये झळकणार आहे. त्याला या सिनेमात पाहण्यासाठी चाहतेदेखील खूप उत्सुक आहेत.
"हीरोपंती" सारख्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रभावी 6.8 कोटी कमावले आणि हा त्याचा धमाकेदार पहिला चित्रपट होता. ज्याने इंडस्ट्रीमध्ये त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. 'बागी', 'बागी 2', आणि अॅक्शन-पॅक्ड 'वॉर' यांसारख्या त्यानंतरच्या चित्रपटांनी त्याच्या कारकिर्दीचा काळ हा उल्लेखनीय ठरला. सुरुवातीच्या आकड्यांना मागे टाकून आणि थिएटरमध्ये गर्दी खेचून आणण्याची त्याची क्षमता ही सगळ्यांनी पाहिली.
बॉक्स ऑफिसची संख्या कायम बोलली जाते आणि म्हणून " बागी 2' ने 'बागी'च्या कलेक्शनपेक्षा दुप्पट कलेक्शन केलं आहे. ज्याने २५ कोटीचा दमदार गल्ला कमावला. "वॉर" ज्यामध्ये त्याने हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली होती आणि त्याने बॉक्स ऑफिसवर तब्बल 53 कोटींची कमाई केली आणि त्याच्या कारकिर्दीत एक नवीन उच्चांक गाठला. कोविड सारख्या आव्हानात्मक काळातही "बागी 3 "ने सुरुवातीच्या काळात 17 कोटींची दमदार कमाई केली.
अलीकडेच 'गणपत' ला 4 कोटींचा ओपनिंग मिळाली आणि चांगला प्रतिसाद मिळून देखील बॉलिवूड इडस्ट्रीतील एका उल्लेखनीय सूत्राने सांगितलं की, टायगरमध्ये उल्लेखनीय सातत्य आहे आणि त्याची सुरुवात त्याच्या पिढीतील कलाकारांसाठी अतुलनीय आहे. हे आकडे त्याचे बॉक्स ऑफिस ड्रॉ आणि जनतेसाठी पोस्टर बॉय म्हणून त्याची प्रतिमा निर्माण करते.
जगन शक्ती दिग्दर्शित "बडे मियाँ छोटे मियाँ," "हिरो नंबर 1," मध्ये अक्षय कुमार सोबत अभिनय करत सिद्धार्थ आनंद निर्मित रॅम्बो आणि अलीकडेच रोहित शेट्टी यांच्यासाठी हैद्राबादमध्ये काही नेत्रदीपक अॅक्शन पॅक साठी टायगर त्याच्या आगामी प्रोजेक्ट साठी सज्ज होत असून " सिंघम अगेन " मध्ये तो दिसणार आहे.