आयसीसमध्ये जाणर होता हा तरुण, आज चालवतोय दुकान

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक इसमला आयसीस दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात आडकण्यापासून दहशदवाद विरोधी पथकाने थांबविले आहे.

Updated: Feb 10, 2019, 02:24 PM IST
आयसीसमध्ये जाणर होता हा तरुण, आज चालवतोय दुकान title=

मुंबई: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक इसमला आयसीस दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात जाण्यापासून दहशदवाद विरोधी पथकाने थांबविले आहे. हा इसम दोन वर्षांपूर्वी हजारो किलोमीटर लांब असलेल्या इराकच्या आयसीस दहशतवादी संघटनेत जाणार होता. पण  दहशदवाद विरोधी पथकाने प्रसंगावधान बाळगून त्याला योग्य रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करुन घेतले आणि हा इसम आता बीड जिल्हात मोबाइल फोन रिपेअरचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचे उदारर्निवाह करत आहे. इराक आणि सीरियाच्या आतंकवादी संघटनांनी ऑनलाइन भर्तीद्वारे अनेक लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवले होते.आणि कट्टरपंथी बनवले होते. 
 
दहशदवाद विरोधी पथकाच्या एका वरीष्ट आधिकाराच्या सांगण्यानुसार तो एकमात्र व्यक्ती नाही. महाराष्ट्रातील अनेक युवक आयसीसच्या सापळ्यात अडकले होते परंतु आता ते रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाच्या मदतीने सामान्य जीवन जगतात. 35 वर्षीय स्नातक अंसारीने 2016 साली सेल्समैन ची नौकरी गमावली होती. आणि तो त्याचा अधिक वेळ ऑनलाइन घालवत असल्याने आयसीस दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. त्याचे ऑनलाइन व्यवहार कळताच त्याची चौकशी करण्यास सुरुवात झाली. दहशदवाद विरोधी पथकाला स्नातक आयसीसच्या जाळ्यात अडकत असल्याचे कळताच त्यांनी समुपदेश देण्यास सुरूवात केली.

दहशदवाद विरोधी पथक प्रमुख अतुलचंद्रा कुलकर्णी यांनी सांगितले,  मुसलमान समाजातील अशा लोकांसाठी मुख्य समस्या म्हणजे बेरोजगारी आहे. कुलकर्णी यांनी सांगितले, 'अशा लोकांना पून्हा नियमीत मार्गावर आणणे फार कठीण असते, आमच्या केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालया द्वारा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र चालवत आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे मागील वर्षी एकूण 239  लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.