Amitabh Bachchan यांच्या घरात वास्तूच्या दृष्टीनं लाखात एक पेंटींग; किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल

वास्तूच्या दृष्टीनं ते अतिशय लाभदायक चित्र आहे. ज्याची किंमत सर्वांनाच हैराण करत आहे. 

Updated: Sep 27, 2022, 02:50 PM IST
Amitabh Bachchan यांच्या घरात वास्तूच्या दृष्टीनं लाखात एक पेंटींग; किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल  title=
there is A paintig worth rupies 4 crores in Amitabh bachchans house

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या राहण्याची शैली पाहताना अनेकजण अवाक् होतात. प्रसिद्धी, पैसा आणि यश सातत्यानं मिळाल्यामुळं आणि चाहत्यांचं अमाप प्रेम मिळाल्यामुळं आजच्या घडीला बऱ्याच सेलिब्रिटींनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. काही कलाकार हे याच प्रसिद्धीत मोठे झाले आणि आता त्यांच्या पुढची पिढी या क्षेत्रात सक्रिय झाली आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे, अभिनेते अमिताभ बच्चन यांचं. 

बच्चन... 'हम जहाँ पे खडे होते है, लाईन वहीसे शुरु होती है', असं म्हणत कित्येक वर्षांपासून त्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. हा अभिनेता एखाद्या राजाप्रमाणं जगतो असं म्हणायला हरकत नाही. आलिशान बंगला, नाव घ्याल ती लक्झरी कार आणि सोबत पावलोपावली साथ देणारं कुटुंब. 

बिग बींची श्रीमंती दाखवून देणाऱ्या बऱ्याच गोष्टी चाहत्यांनी आजवर पाहिल्या आहेत. या गोष्टींमधूनच एकीची चर्चा काही दिवसांपूर्वी झाली होती. बच्चन यांचा एक सहकुटुंब सहपरिवार असा Family Photo सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी फोटोमध्ये नेमके कोणते सदस्य आहेत त्याऐवजी चर्चा झाली ती त्यात दिसणाऱ्या एका पेंटिंगची. 

अधिक वाचा : खऱ्या प्रेमाच्या शोधात अविवाहित राहिलेल्या आशा पारेख, यांना 'या' दिग्दर्शकाशी करायचं होतं लग्न !

खुद्द बिग बींनीच फोटो शेअर करत त्यामध्ये माणसाची वेळ बदलते अशा आशयाचं कॅप्शनही लिहिलं होतं. ते पेंटिंग होतं एका बैलाचं. तुम्हाला माहितीये का हे काही साधंसुधं चित्र नाही. तर वास्तूच्या दृष्टीनं ते अतिशय लाभदायक चित्र आहे. ज्याची किंमत तब्बल 4 कोटी रुपये इतकी आहे. 

कोण आहे त्या चित्राचा चित्रकार? 
बच्चन कुटुंबीयांकडे असणाऱ्या या कोट्यवढींच्या पेंटिंगला साकारण्याचं काम मंजित बावायांनी काढलं होतं. भारतीय आणि सुफी पुराणकथांमधून प्रेरणा घेत चित्र काढण्यात त्यांची महारथ. काली, शिव, प्राणी, निसर्ग आणि त्यांचा मानवी जीवनाशी असणारा संबंध या गोष्टी त्यांच्या चित्रात साकारल्या जातात. बच्चन यांच्या घरी असणारं चित्र त्यांच्या कलाकृतीचं एक उदाहरण. 

वास्तूच्या दृष्टीनं काय आहेत या चित्राचे फायदे? 
- Bull Painting दक्षिणेकडी भींतीवर लावल्यास त्याचा फायदा होतो. ही दिशा यशाची आहे. 
- धावणारा बैल वेग आणि प्रगतीचं प्रतीक आहे. 
- बैल हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे. 
- पांढऱ्या बैलाचं चित्र लावणं फायद्याचं ठरतं कारण हा शांततेचा रंग आहे. यामुळं आर्थिक अडचणी दूर होतील. 
- सकारात्मक उर्जेचं द्योतक म्हणूनही बैलाकडे पाहिलं जातं.