बिग बॉस ११ : 'हे' ३ सदस्य असणार फायनलिस्ट

टीव्हीमधील सर्वात वादग्रस्त आणि चर्चेत असलेला शो म्हणजे 'बिग बॉस'. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 27, 2017, 03:06 PM IST
बिग बॉस ११ : 'हे' ३ सदस्य असणार फायनलिस्ट

नवी दिल्ली : टीव्हीमधील सर्वात वादग्रस्त आणि चर्चेत असलेला शो म्हणजे 'बिग बॉस'. 

बिग बॉसच्या या ११ व्या सिझनमध्ये अगदी सुरूवातीपासूनच आपल्याला हंगामा पाहायला मिळत आहे. या बिग बॉसच्या घरात या ना त्या कारणाने वाद होतच आहेत. 

या रविवारी बिग बॉसच्या घरातून सपना चौधरी बाहेर पडली आणि लगेचच तिने एका यू ट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने घराशी जोडलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या. या मुलाखतीत तिने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि ते म्हणजे तिने बंदगीला 'बंदरिया' म्हणजे माकडं असं संबोधलं. एवढंच नाही तर तिने पुढे असं देखील म्हटलं की चुकून मी खरं बोलून गेली. 

सपना - शिल्पामध्ये का आला दुरावा? 

तसेच तिने पुढे हे देखील सांगितले की, आतापर्यंतचा तिचा हा प्रवास अतिशय चांगला होता. सुरूवातीच्या दिवसांमध्ये सपना आणि शिल्पा या दोघींमध्ये चांगली मैत्री होती मात्र पुढे असं काय झालं की, त्या दोघींमध्ये अंतर  वाढू लागलं. तेव्हा सपनाने सांगितलं की, सुरूवातीला अर्शी आणि शिल्पामध्ये प्रचंड वाद झाला होता. त्यानंतर शिल्पा एकटी राहू लागली. आणि यामुळेच आमच्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. मात्र पुन्हा अर्शी आणि शिल्पामध्ये पॅचअप झाल्यावर मी वेगळी झाली असं देखील तिने सांगितलं. 

हे असणार ३ फायनलिस्ट 

त्याचप्रमाणे सपनाने सांगितलं की, तिला या बिग बॉस ११ च्या सिझनचे फायनलिस्ट हे ३ स्पर्धक वाटतात. हिना, विकास आणि शिल्पा हे तिघे यंदाचे बिग बॉस ११ फायनलिस्ट असतील. त्यापुढे तिला विचारण्यात आलं की यामध्ये ती कुणाला शो जिंकताना पाहण्याची इच्छा ठेवते. तेव्हा तिने क्षणाचा ही विलंब न करता आकाश ददलानीचं नाव घेतलं.