Sanjeev Kumar : अभिनेते हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावर्षीही या दोघांची बरीच चर्चा रंगली होती. परंतु तुम्हाला माहितीये का की हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न झाले नसते कारण हेमा मालिनी यांचे या लग्न हे त्यापुर्वी एका दिग्गज अभिनेत्याशी ठरले होते. परंतु त्या अभिनेत्याच्या आईच्या एका निर्णयामुळे हेमा मालिनी यांनी आपले लग्न मोडले होते. त्यामुळे त्यांचे लग्न काही होऊ शकले नाही. त्यातून आता ही अभिनेत्री धर्मेंद्र यांच्याशी विवाह बंधनात आहे आणि त्यांचा संसार हा गेली अनेक वर्ष सुरू आहे. त्यांचा हा सुखी संसार पाहून आजकालच्या तरूणांनाही कॉम्पेक्स येईल हे नक्की. आज हे अभिनेते या जगात नाहीत. परंतु त्यांची लोकप्रियता ही फारच अफाट होती. त्यांचे अनेक चित्रपट हे लोकप्रिय आहेत. त्यातून त्यांची सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगलेली असते. आजही त्यांच्याबद्दल लिहिले आणि बोलले जाते.
या दिवगंत ज्येष्ठ अभिनेत्याचं नावं आहे संजीव कुमार. संजीव कुमार हे लोकप्रिय बॉलिवूडचे अभिनेते होते. 1985 साली वयाच्या 47 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. परंतु तुम्हाला माहितीये का की, संजीव कुमार यांचे हेमा मालिनी यांच्याशी लग्न ठरले होते.
70-80 च्या काळात हेमा मालिनी या फारच लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांची अफाट लोकप्रियता होती. त्यांचे अनेक सिनेमे हे प्रचंड गाजले होते. सोबतच संजीव कुमारही प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे जेव्हा हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती तेव्हाही प्रचंड चर्चा रंगलेली होती.
हेही वाचा : 'हम साथ साथ हैं' मधील सलमानची ऑनस्क्रीन भाची पाहा किती बदलली...
मीडिया रिपोर्ट्समधून असं कळते की, संजीव कुमार हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या अभिनयाचेही ते प्रचंड फॅन होते. त्यांची लोकप्रियताही तेव्हा खूप जास्त होती. सोबतच ते हेमा मालिनी यांच्या इतके प्रेमात पडले होते की काही विचारू नका. ते त्यांच्याशी लग्न करणार होते. असं म्हणतात की संजीव कूमार हे आपल्या आईला घेऊन थेट हेमा मालिनी यांच्या घरीही गेले होते. त्यातून संजीव कुमार यांच्या आईनं मात्र हेमा मालिनी यांच्यासमोर आपला एक निर्णय सांगितला होता. ज्यामुळे हेमा मालिनी या फारच अपसेट झाल्या. तो निर्णय असा होता की लग्न झाल्यावर अभिनय करणार नाही. त्यामुळे हेमा मालिनी यांनी लग्न मोडले आणि त्यांचे लग्न काही होऊ शकले नाही.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.