सलमान, शाहरुख आणि आमिरसोबत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्रीने लागोपाठ दिले 50 फ्लॉप! पण नंतर ठरली बॉलिवूड क्वीन

Actress gave 50 flops : या अभिनेत्रीनं कधी केलं सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानसोबत काम... मात्र, त्यानंतर लागोपाठ दिले 50 फ्लॉप...

दिक्षा पाटील | Updated: Feb 16, 2024, 07:06 PM IST
सलमान, शाहरुख आणि आमिरसोबत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्रीने लागोपाठ दिले 50 फ्लॉप! पण नंतर ठरली बॉलिवूड क्वीन title=
(Photo Credit : Social Media)

Actress gave 50 flops : 90 च्या दशकातील सर्वात सुंदर आणि आघाडीची अभिनेत्री म्हणजे मनीषा कोयराला. मनीषानं एकामागोमाग एक अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर तिच्या कारकिर्दीला पडझड झाली. मनीषा कोयराला 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सौदागर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर मनीषा रातोरात सुपरस्टार झाली. त्यानंतर 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या '1942 : अ लव्ह स्टोरी' मध्ये  मनीषा दिसली. या चित्रपटानंतर काय तर तिच्यामागे जशी  निर्मात्यांची लाईन लागली होती. 

मनीषानं सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानसोबत काम केलं होतं. त्यामुळे तर तिला आणखीनचं लोकप्रियता मिळू लागली होती. यानंतर मनीषाला अनेक चित्रपट मिळाले त्यात 'क्रिमिनल', 'बॉम्बे', 'अकेले हम अकेले तुम', 'दुश्मन' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. 2000 साल येई पर्यंत मनीषा कोयरालानं बॉलिवूडमध्ये तिचं वर्चस्व प्रस्थापित केलं होत. 'गुप्त', 'दिल से', 'कच्चे धागे', 'मन' यांसारखे सुपरहिट चित्रपट देखील दिले. मात्र, पुढे जाऊन तिच्या करिअरमध्ये सुमारे 50 फ्लॉप चित्रपट फ्लॉप गेले. त्यानंतर तिला खूप मोठे धक्के बसले. ज्यामुळे तिच्या कारकिर्दीत उतरती कळा लागली.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मनीषानं हिंदी, दक्षिण भारतीय आणि नेपाळी सिनेमांसह विविध फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं. मनीषानं अष्टपैलू भुमीकांच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, तिच्या कारकिर्दीमध्ये, एक निर्णायक क्षण आला, जेव्हा तिच्या कारकिर्दीला तिचा शेवटचा मोठा तमिळ चित्रपट 'बाबा' चित्रपट फ्लॉप झाला.  ज्यामुळे दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात तिला काम मिळणं बंद झालं. 

हेही वाचा : 'माझा शेवटचा चित्रपट...', चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान घेणार रिटायरमेन्ट!

मात्र, मनीषाच्या कारकिर्दीत एक काळ असा पण आला, जेव्हा ती नशेच्या आहारी गेली होती. पुढे जाऊन 2012 मध्ये मनीषाला कर्करोगाचा देखील सामना करावा लागला. त्यावेळी तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. मात्र, कर्करोगावर सुरु असलेल्या उपचारा अभावी तिनं त्या सगळ्या प्रोजेक्ट्सला नकार दिला होता. ज्यातून ती यशस्वीरीत्या बाहेर पडली. मात्र, तो पर्यंत इंडस्ट्री तिला विसरून गेली होती. मनीषानं त्यानंतरच्या काळात लहान साहन काम केली. मात्र, तिला फारस यश मिळालं नाही. आता मनीषा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.