जगातील सगळ्यात सुंदर महिला आहे ही अभिनेत्री; अगदी सायन्सला देखील स्वीकारावं लागलं हे सत्य

जगातील सर्वात सुंदर स्त्रीचा किताब अनेक सौंदर्यवतींना देण्यात आला आहे. 

Updated: Jul 5, 2022, 05:10 PM IST
जगातील सगळ्यात सुंदर महिला आहे ही अभिनेत्री; अगदी सायन्सला देखील स्वीकारावं लागलं हे सत्य title=

मुंबई : जगातील सर्वात सुंदर स्त्रीचा किताब अनेक सौंदर्यवतींना देण्यात आला आहे. परंतु या यादीत भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं नाव अव्वल स्थानावर आहे. यावेळी या हॉलिवूड सौंदर्यवतीने अॅशकडून हे शीर्षक हिसकावून घेतलं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून अंबर हर्ड आहे. जी अलीकडे जॉनी डेपसोबत घरगुती हिंसाचाराचा खटला लढत होती. एका संशोधनानुसार, अभिनेत्रीच्या चेहऱ्याने  सायन्सच्या प्रत्येक मापदंडाची पूर्तता केली आहे. त्यानंतर एम्बर हर्ड आता जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत सामील झाली आहे.

सायन्स पॅरामीटर्सवर फिट बसतो चेहरा
यूकेस्थित कॉस्मेटिक सर्जनच्या अभ्यासानुसार, अंबर हर्डच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये, डोळे, ओठ आणि चेहऱ्याच्या आकाराचं विश्लेषण करण्यात आलं. त्यानंतर तिचा चेहरा एकदम परफेक्ट असल्याचं निकालात दिसून आलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटिश कॉस्मेटिक सर्जन डॉ ज्युलियन डी सिल्वा यांनी अभ्यास केल्यानंतर सांगितलं की, एम्बर हर्डचा चेहरा विज्ञानाच्या सेट स्केलच्या जवळपास 91 टक्के जुळतो. संशोधनात डिजिटल फेशियल मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.

कसा ठरवला जातो सौंदर्याचा पॅरामीटर?
कॉस्मेटिक सर्जन डॉ ज्युलियन डी सिल्वा यांनी सांगितलं की त्यांनी हे संशोधन 2016 मध्ये केलं होतं. ज्यामध्ये 'ग्रीक गोल्डन रेशो ऑफ ब्युटी'चा वापर करण्यात आला होता. लोकांना ते Phi द्वारे देखील माहित आहे. माहितीनुसार, या प्रक्रियेत हर्डच्या चेहऱ्याच्या 12 मुख्य मुद्द्यांवर संशोधन करण्यात आलं.

एका मुलाखतीत बोलताना ज्युलियनने सांगितलं की, हा फॉर्म्युला ग्रीक लोकांनी लावला होता. जगातील सर्वात सुंदर चेहरे शोधण्यासाठी हजारो वर्षांपासून याचा वापर केला जात आहे.

जॉनी डेपवर घरगुती हिंसाचाराचा आरोप होता
एम्बर हर्ड नुकतीच घरगुती हिंसाचार प्रकरणामुळे चर्चेत आली होती. अनेक दिवसांच्या कायदेशीर लढाईनंतर एम्बर केस हरली. आम्ही तुम्हाला सांगतो की एम्बर हर्डची जॉनीसोबत २०११ मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. दोघांनी 2015 मध्ये लग्न केलं होतं. तर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.