Women Security : जगातल्या विविध देशात महिलांच्या सुरक्षेची स्थिती वेगवेगळी आहे. काही देशात महिलांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं, तर काही देशात महिला सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात. जाणून घेऊया कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित आहेत.
जगातले सुरक्षित देश
अभ्यास आणि सर्व्हेच्या आधारावर महिलांसाठी जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत उत्तर यूरोपमधील देशांचा समावेश आहे. या देशात महिलांना सुरक्षा आणि समानता दिली जाते.
आईसलँड - आईसलँड हा जगातील सर्वात सुरक्षित देश मानला जातो. या देशात महिलांना राजकीय आणि व्यापार क्षेत्राबरोबरच समाजातही समान संधी दिली जाते.
नॉर्वे - नॉर्वे हा देश महिलांसाठी सुरक्षित मानला जातो. इथे महिला अत्याचारातील प्रकरणात कठोर कायद्याची तरतूद करण्यात आली आहे.
फिनलँड - फिनलँड या देशात महिलांना शिक्षक आणि नोकरीत समान संधी देण्यात आली आहे. या देशात राजकीय क्षेत्रातही महिलांची संख्या लक्षणीय आहे.
स्वीडन - स्वीडनमध्ये महिलांसाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबवण्यात आल्या आहेत. इथे महिलांना प्रसूती रजा आणि बाल संगोपन सुविधा उपलब्ध आहेत.
डेन्मार्क - डेन्मार्कमधील महिलांना लैंगिक समानतेसाठी अनेक कायदेशीर संरक्षण दिलं जातं
भारतात महिला किती सुरक्षित?
भारतात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे. भारत सरकारकडून महिलांच्या सुरुक्षेसाठी अनेक कठोर पावलं उचलली जातात. पण महिलांच्या अत्याचाराच्या घटनेत कमी झालेली नाही.
कोणत्या आधारावर महिलांसाठी देश सुरक्षित मानला जातो?
कोणत्या देशातील महिला सुरक्षित आहेत यासाठी अनेक मुद्दयांचा विचार केला जातो. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराप्रकरणी त्या देशातील कायदे, त्या कायद्याची किती कठोर प्रमाणात अंमलबजावणी केली जात. याशिवाय महिलांना शिक्षणात आणि नोकरीत दिली जाणारी संधी. महिलांच्या आरोग्यासाठी कोणत्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. महिलांना समाजात मिळणारा दर्जा आणि महिलांच्या विचारांचा सन्मान या सर्व गोष्टींचा विचार करुन कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित आहेत, याचा अहवाल तयार केला जातो.