'या' चिमुकलीला ओळखलत का? कधी फक्त एक वेळ जेवायची अन् आज 101 कोटी संपत्तीची मालकीण

Artist : या अभिनेत्रीवर अशीच एक वेळ आली होती जेव्हा तिच्याकडे एक वेळचं जेवणासाठी पैसे नव्हते आणि आज आहे कोटींच्या संपत्तीची मालकीण... तुम्ही ओळखू शकता का या लाखोंच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीला...

दिक्षा पाटील | Updated: Aug 6, 2023, 05:08 PM IST
'या' चिमुकलीला ओळखलत का? कधी फक्त एक वेळ जेवायची अन् आज 101 कोटी संपत्तीची मालकीण title=
(Photo Credit : Social Media)

लहाणपणी आपल्या अनेकांना कळत नाही की आपण मोठं होऊन काय होणार... अनेकदा आपले आई-वडील यांनाही कळत नाही की आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो. पण अनेकांना हे आधीच कळत तर काही लोक हे चुकून कलाकार होतात. असंच काहीसं एका कलाकारासोबत झालं आहे. हा कोणताही अभिनेता नाही तर अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती व्यक्ती...

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. समांथानं प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं एक स्थान निर्माण केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या ही लाखोंमध्ये आहे. समांथनानं तिच्या करिअरची सुरुवात ही गौतम वासुदेव मेनन यांचा तेलगू चित्रपट 'ये माया चेसावे (2010)' नं केली होती. त्या चित्रपटाचा तमिळ रिमेक देखील करण्यात आला होता. या चित्रपटाआधीच प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु होती. त्याचं कारण समांथा नाही तर गौतम मेनन आणि संगीतकार एआर रहमान यांच्यामुळे होती. समांथानं एक ऑडिशन दिलं होतं त्यानंतर ती या प्रोजेक्टचा भाग झाली होती. चित्रपटाचं शूटिंग हे भारत आणि अमेरिकेत झालं होतं. तर चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समांथाच्या करिअरची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे झाली त्यानंतर ती मोठ्या बजेटमधल्या चित्रपटांचा भाग झाली. समांथानं आजवर महेश बाबू, सिद्धार्थ, पवन कल्याण सारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं आहे. आता यावरून अनेकांना वाटतं असेल की समांथाला खूप सोप्या पद्धतीनं यश मिळालं आहे. पण तसं नाही. समांथानं देखील इतर कलाकारांप्रमाणे स्ट्रगल केलं आहे. समांथानं मॉडेलिंग करत असताना मॅरिस कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यानंतर समांथा फूल टाईम मॉडेलिंग करू लागली. तिला देखील स्ट्रगल केलं असून इतरांप्रमाणे तिनं अनेक गोष्टींचा सामना केल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. एकवेळ तर अशी होती जिथे समांथा फक्त एक वेळचं जेवण करायची. त्याच्या विरोधात आज जर बोलायचं झालं तर समांथा मोठ्या मोठ्या ब्रॅंडची फक्त जाहिरात करत नाही तर एक लोकप्रिय अभिनेत्री देखील आहे. आज याच समांथाची 101 कोटींची नेटवर्थ Top Movie Rankings नं दिलेल्या माहितीनुसार असल्याचे म्हटले जाते. 

हेही वाचा : 'सडलेलं बॉलिवूड नाही तर...', चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर सनी देओलचं रोखठोख मत

समांथानं मनोज वाजपेयी यांच्या द फॅमिली मॅन या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. या सीरिजमधून तिला एक वेगळीच ओळख मिळाली. त्यातील समांथाचा बोल्ड लूक हा चांगलाच चर्चेत राहिला होता.