Guess Who is the Bollywood Actor : फक्त भारतात नाही तर परदेशातही अनेकांनी गरिबी आणि संघर्ष पाहिला आहे. अशात अनेक मुलं खूप मेहनत करतात आणि खूप यशस्वी होतात. अशाच एका मुलानं जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्यानं त्याची प्रतिभा दाखवण्याची संधी सोडली नाही आणि चित्रपटसृष्टीत सगळ्यांचे लक्ष वेधले. आता हा मुलगा कोण असेल याचा विचार तुम्ही करु शकता का? किंवा काही अंदाज लावू शकतात का? चला आणखी एक गोष्ट सांगते ते वाचल्यावर तुम्हाला कदाचित हा अभिनेता कोण हे लक्षात येईल. तर जेव्हा हा मुलगा मोठा झाला आणि यानं चित्रपटसृष्टीत प्रदार्पण केलं तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर या अभिनेत्यानं त्याच्या आईला मुलीसारखं वागवलं. इतकंच नाही तर तिची खूप काळजी देखील घेतली. याच अभिनेत्याचा जीव एकदा धोक्यात आला होता आणि त्याच्या पोटातून तब्बल 15 लीटर पू काढण्यात आला होता.
वडील असताना हा मुलगा मोठा झाला आणि एक अभिनेता झाला होता आणि त्यासोबत त्यानं स्वत: ची ओळख देखील मिळवली होती. पण जेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यानं मुंबईसोबत चित्रपटसृष्टी देखील सोडून दिली आणि ऋषिकेसला जाऊन स्थित झाला. तिथे हा अभिनेता एका ढाब्यावर काम करू लागला. इतकंच नाही तर तिथे त्यानं चहा देखील विकला. आता तुम्ही सांगू शकता हा अभिनेता कोण आहे? अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल तर चला मी सांगते.
या अभिनेत्याचे नाव संजय मिश्रा असे आहे. संजय मिश्रा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये लहान-लहान भूमिका साकारलत केले. तर 1991 मध्ये त्यांनी 'चाणक्य' या मालिकेत काम केले. ज्यात त्यांनी तब्बल 28 रीटेक दिले होते. तर 1995 मध्ये संजय मिश्रा यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव 'ओ डार्लिंग ये है इंडिया' असे होते. त्यानंतर त्यांनी 'सत्या', 'दिल से', 'बंटी और बबली' आणि 'अपना सपना मनी मनी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
हेही वाचा : 'हा' बालकलाकार ठरलेला पहिल्यांदाच 1 कोटींचं मानधन घेणारा अभिनेता; आज घेतोय 100 कोटी रुपये, ओळखलं का त्याला?
'गोलमाल', 'ऑल द बेस्ट' आणि 'धमाल' सारख्या चित्रपटांमध्ये संजय मिश्रा यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली. संजय मिश्रा यांना आज चित्रपटाच्या अनेक ऑफर येतात आणि ते सतत काम करताना दिसतात. पण जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, तेव्हा त्यांनी जे काही पाहिलं ते आजपर्यंत ते विसरू शकले नाही. जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, तेव्हा त्यांचं लग्न देखील झालं नव्हतं. वडिलांचे निधन झाल्यानंतर आईची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली होती. आईला त्यांनी मुलीसारखं सांभाळलं, पण त्यांच्या मनात एकच खंत राहिली आहे की नाही ते एक चांगले वडील होऊ शकले नाही चांगले भाऊ. संजय मिश्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की ना ते त्यांच्या वडिलांना वाचवू शकले ना त्यांच्या भावाला. संजय मिश्रा यांनी सांगितलं की त्यांना आजही या गोष्टीचा पश्चाताप आहे की त्यांच्या भावाला ते वाचवू शकले नाही.