या छोट्या मुलाला तुम्ही ओळखलत का? आज आहे फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार

बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated: Oct 26, 2021, 10:34 PM IST
या छोट्या मुलाला तुम्ही ओळखलत का? आज आहे फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषत: लोकांना त्यांच्या बालपणीचे फोटो बघायला खूप आवडतात. आजकाल सोशल मीडियावर नवा ट्रेंड सुरू झाला आहे की, फॅनपेजच्या आवडत्या स्टार्सचा फोटो पोस्ट करून त्यांना ओळखण्याचं आव्हान देतात. याच ट्रेंडमध्ये एका सुपरस्टार अभिनेत्याचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. जो चाहत्यांच्या ओळखण्यासाठी परीक्षेपेक्षा कमी नाही. हा फोटो पाहिल्यानंतर बहुतांश लोकांनी डोक्याला हात लावला आहे.

या फोटोमध्ये तुम्ही एक मूलगा पाहू शकता ज्याच्या हातात पुस्तक आहे. या मुलाच्या निरागसतेने लोकांची मने जिंकली आहेत. फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार कमल हासन आहेत. होय, हे आहेत साऊथ सिनेसृष्टीतील स्टार कमल हसन.

कमल हसनबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी दोन लग्नं केली आहेत. त्यांनी पहिलं लग्न 1978 मध्ये वाणी गणपतीशी, तर दुसरं लग्न सारिकाशी केलं. मात्र, हे लग्नही फार काळ टिकलं नाही. सारिका आणि कमल हसन यांना श्रुती आणि अक्षरा हसन नावाच्या दोन मुली आहेत. चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर ते तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसलं आहेत. त्यांना आतापर्यंत 4 राष्ट्रीय पुरस्कार, 17 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. पटकथा लेखक म्हणून त्यांनी पहिल्यांदा 'उनारचिगल' लिहिलं.