Shah Rukh Khan Big Flop Film Turn 13: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याने इंडस्ट्रीत त्याची खास ओळख निर्माण केली आहे. परंतु काही चित्रपटांमध्ये त्याला अपयशाचा सामना करावा लागला. पण शाहरुख खानने हार मानली नाही. तो पुढे देखील वेगवेगळे चित्रपट करत राहिला. अशाच एका चित्रपटाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शाहरुख खानचा हा चित्रपट 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अभिनेत्याच्या या चित्रपटाबद्दल सर्वांनाच मोठी अपेक्षा होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. शाहरुख खानचा हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीताल सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता.
हा आहे शाहरुख खानचा सर्वात फ्लॉप चित्रपट
शाहरुख खानचा 2011 मध्ये 'रा-वन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे अनुभव सिन्हा यांनी केले होते. या चित्रपटात शाहरुख खानसह करीना कपूर, रामपाल यादव आणि अरमान वर्मा हे कलाकार होते. 'रा-वन' चित्रपटाला आता 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एक पोस्ट शेअर करत शाहरुख खानचे आभार मानले आहेत. त्यासोबतच शाहरुख खानसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, मी या चित्रपटाचा आणि शाहरुख खानचा नेहमीच ऋणी राहिल. शाहरुख खानच्या टीमचे आभार. खूप प्रेम.
शाहरुख खानचा 'रा-वन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र, या चित्रपटामधील गाणी मोठ्या प्रमाणात हिट झाली. आज देखील या चित्रपटातील गाणी पार्टीमध्ये किंवा वेगवेगळ्या सणांमध्ये ऐकायला मिळतात.
चित्रपटात शाहरुख खानच्या दोन भूमिका
'रा-वन' या चित्रपटामध्ये माणूस आणि यंत्र यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला होता. चित्रपटात शाहरुख खानने दोन भूमिका साकारल्या होत्या. 'रा-वन' या चित्रपटाची कथा खूपच रंजक होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई करू शकला नाही. रिपोर्टनुसार, 'रा-वन' चित्रपटाचे बजेट 130 कोटी रुपये होते. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतात 114 कोटी रुपयांची कमाई केली होती.
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र, नंतर हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. OTT वर हा चित्रपट आल्यानंतर चाहत्यांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. त्यानंतर चाहते आता या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. अनुभव सिन्हा यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यांनी या चित्रपटाचा भाग 2 कधी येणार आहे. असा प्रश्न विचारला आहे.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.