'आयुष्य संपलं...', आजारामुळे 30 किलो वजन वाढल्याने अभिनेत्रीने अन्न सोडलं

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 25, 2024, 05:46 PM IST
'आयुष्य संपलं...', आजारामुळे 30 किलो वजन वाढल्याने अभिनेत्रीने अन्न सोडलं title=
(Photo Credit : Social Media)

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत प्रवास करत स्वत: ची एक वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री मौनी रॉय ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मौनीला खरी लोकप्रियता ही कोणत्या मालिकेतून मिळाली असेल तर ती आहे 'नागिन' सीरियल. मात्र, या मालिकेनंतर ती अचानक लाइमलाईटपासून दूर झाली. तिचं वजन इतकं वाढलं की तिला वाटलं की आता सगळं संपलं. याविषयी मौनीनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत मौनीनं सांगितलं की एकदा तिचं अचानक 30 किलो वजन वाढलं होतं. त्यामुळे तिला खूप चिंता वाटू लागली होती. याविषयी सांगत मौनी म्हणाली, 'एकदा ती आजारी पडली होती. ते काही जवळपास 7-8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी खूप गोळ्या, पेनकिलर्स आणि औषध घेत होते. मला L4-L5 स्लिप डिस्क डिजनरेशन आणि कॅल्शियम स्टोन होता. या आजारामुळे तीन महिने अक्षर:श अंथरूनावर पडून होते, त्यामुळे माझं तीस किलो वजन वाढलं.'  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मौनीनं पुढे सांगितलं की 'मला खरंच असं वाटलं की माझं आयुष्य संपलं. त्यावेळी कोणी मला पाहिलं नाही आणि मग नागिन केल्यानंतर मी त्यावेळी लाईम लाइटमध्ये नव्हते. मी विचार करायचे की इतकं वजन कसं कमी करू. त्यामुळे मी औषध घेणं बंद केलं. तर त्यामुळे अर्ध वजन कमी झालं, मी अशा प्रकारे थोडं वजन कमी केलं. मी तीन दिवस, चार दिवस, पाच दिवस ज्यूस प्यायले आणि फक्त चिडचिड करू लागली होती. माझा मूड खूप खराब व्हायचा. मला कोणाशी बोलण्याची इच्छा होत नव्हती. मग मला या गोष्टीची जाणीव झाली की नाही बाबा मी जेवण करायला हवं. त्यावेळी एक समस्या होती की मी खूप जास्त खायचे. मी तीन लोकांचे जेवण एकावेळी करायचे.' 

हेही वाचा : 'रणबीरनं घरी येऊन केली होती विनंती....', कंगना रणौतचा मोठा दावा

मोनी पुढे म्हणाली, 'मी या गोष्टीला कंट्रल केलं. मी त्याला बंद केलं कारण तुमच्या शरीराला इतक्या जास्त खाण्याची गरज नाही.'