मुंबई : मलायका अरोरा आणि अरबाज खान ही जोडी भलेही आज एकत्र नाही. मात्र एककाळ असा होता जेव्हा इंडस्ट्रीमध्ये मलायका आणि अरबाजचा बोलबाला होता. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या प्रत्येक मोठ्या पार्टीत मलायका आणि अरबाजची जोडी पहायला मिळायची. 19 वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेत सगळ्यांना धक्का दिला. या दोघांना अरहान खान नावाचा एक मुलगा देखील आहे.
आज आम्ही तुम्हाला मलायकाच्या एका जुन्या मुलाखतीबद्दल सांगणार आहोत. या मुलाखतीमध्ये मलायकाला विचारण्यात आलं होतं की, तुला कमी वयात लग्न केल्याचा पश्चताप होतो का? या प्रश्नावर उत्तर देत मलायका म्हणाली की, ''लग्न करणं आणि आई बनणं हा निर्णय कोणत्याही प्रकारे माझ्या माझ्या करिअरला थांबवणारा नव्हता. एवढचं नाही तर लग्न करणं माझ्यासाठी कोणत्याच निर्णय आणि चॉईसेसमध्ये नाही आला.''
मलायकाच्या म्हणण्यानुसार कमी वयात लग्न करण्याच्या निर्णयाने तिच्या करिअरवर कोणाचा फरक पडला नाही.उलट तिच्या लग्न आणि गरोदरपणासारख्या मुद्द्यांना ग्लॅमरस इमेजमधून ग्लॅमरची छटा मिळाली. मलायका पुढे म्हणाली, ''ज्या काळात ती आई बनली त्या काळात खूप कमी महिला होत्या ज्या आई बनून आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकल्या.''
मलायकाच्या म्हणण्यानुसार, आता मात्र वेळ बदलली आहे. आणि आता महिला प्रेग्नंसी दरम्यानही आपल्या करिअरवर पुर्ण लक्ष देतात. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आता अभिनेता अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. याचबरोबर अभिनेता अरबाज खानदेखील इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.