आराध्या बच्चनचा थ्रोबॅक फोटो व्हायरल; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

आराध्याचं फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. 

Updated: Apr 8, 2022, 05:03 PM IST
आराध्या बच्चनचा थ्रोबॅक फोटो व्हायरल; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव title=

मुंबई : अमिताभ बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या राय हे बच्चन कुटुंबात जेवढे लोकप्रिय आहेत. तेवढीच त्यांची 10 वर्षांची मुलगी आराध्या बच्चनही लोकप्रिय आहे. होय, आराध्याचं फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. इंस्टाग्रामवर तिची हजारो फॅन पेज आहेत. तिचे दैनंदीन जीवनाचे आणि तिचे  थ्रोबॅक फोटो विशेषतः तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले जातात.

त्याचबरोबर, तिच्या फॅन पेजवर तिच्या थ्रोबॅक शाळेच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले गेले आहेत. राव नवमीच्या आधी तिच्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या खास प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

आराध्याचे व्हायरल अनसीन फोटो
आराध्या बच्चनचे काही न पाहिलेले फोटो आहेत जे सोशल मीडियावर विशेष पसंत केले जात आहेत. आराध्याचे हे फोटो तिच्या तिच्या स्कूल फंक्शनचे आहेत. या फोटोंमध्ये आराध्या सीतेच्या अवतारात दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. त्याच्यासोबत इतर फोटोंमध्ये तिचे क्लासमेटही दिसत आहेत. या फोटोंमध्ये आराध्या खूपच सुंदर दिसत आहे.

चाहत्यांकडून आराध्याचं जोरदार कौतुक 
व्हायरल होत असलेले हे फोटो पाहून चाहते जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की,  क्या बात है, आराध्या खूप टॅलेंटेड आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने खूप गोड अशी प्रतिक्रीया दिली आहे. आराध्याचे एअरपोर्टवरील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ती बहुतेकदा तिच्या आई वडिलांसोबत स्पॉट होते.