मुंबई : सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'टायगर' आणि 'झोया'ला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सलमानला 'पठाण'मध्ये 'टायगर'च्या भूमिकेत कॅमिओ करताना चाहत्यांनी पाहिलं, तेव्हापासून त्यांची उत्सुकता गगनाला भिडली आहे. वायआरएफच्या गुप्तचर विश्वाचा एक भाग म्हणून शाहरुख खान 'टायगर 3' मध्ये 'पठाण'च्या भूमिकेतही दिसणार असल्याची चर्चा आहे.
आदित्य चोप्रा YRF स्पाय युनिव्हर्सची एक एक वीट रचत आहे आणि सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर 3 हा आगामी सिनेमा बिग बजेट आहे. टायगर उर्फ सलमान खान हा YRF स्पाय युनिव्हर्सचा OG आहे कारण एक था टायगर (2012) याने भारतीय चित्रपटसृष्टीने यापूर्वी कधीही न पाहिलेलं सुपर ऐजेंट तयार करण्यासाठी मूकपणे योजना राबवली!
'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है'च्या प्रचंड यशाने आदित्य चोप्राचा विश्वास दृढ केला आहे की, तो कबीर उर्फ हृतिक रोशन आणि पठाण उर्फ शाहरुख खान यांना त्याच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सामील करू शकतो.
पठाणमध्येच आदित्य चोप्राने अधिकृतपणे खुलासा केला आहे की, ते वायआरएफ स्पाय युनिव्हर्स बनवत आहेत आणि फ्रेंचाइजी लोगोचं त्यांनी अनावरण केलं आहे. या महत्त्वाकांक्षी गुप्तचर विश्वातील पात्रांच्या क्रॉसओवर सुरुवात पठाणपासूनही झाली आहे. ज्यामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान या दोन सिनेमॅटिक आयकॉन्सच्या सुपरस्टारडमचा उत्सव साजरा करणाऱ्या अॅड्रेनालाईन पंपिंग अॅक्शन सीक्वेन्स मध्ये एकत्र आले.
या क्रॉस-ओव्हरने प्रेक्षक आणि चाहत्यांना हे सांगण्याचा YRF चा हेतू देखील दर्शविला की, हे सुपर-स्पाय दाखवणारा प्रत्येक चित्रपट एकमेकांशी जोडलेला असेल. टायगर 3 चे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केलं आहे.
#Tiger3Trailer coming to roar louder than ever on 16th October. #Tiger3 arriving in cinemas this Diwali. Releasing in Hindi, Tamil & Telugu. #YRF50 | #YRFSpyUniverse pic.twitter.com/7KzMZA8Nx4
— Yash Raj Films (@yrf) October 4, 2023
आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'टायगर 3' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'टायगर 3' यावर्षी दिवाळीला मोठ्या पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. नुकतीच यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहिती दिली आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.