टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीने दिली प्रेमाची कबुली?

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीने 'व्हॅलेंटाइन डे'ला खास फोटो शेअर केला आहे.

Updated: Feb 15, 2019, 12:23 PM IST
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीने दिली प्रेमाची कबुली? title=

मुंबई : 'व्हॅलेंटाइन डे'ला अनेक जण आपलं प्रेम व्यक्त करत असतात. यात बॉलिवूड कपल्सही मागे नाहीत. असाच एक फोटो बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीने पोस्ट केला आहे. दोघांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे त्यांचे चाहते मोठ्या भ्रमात पडले आहेत. दोघांनीही त्यांचे बोटात अंगठी घातलेले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमुळे दोघांनी साखरपुडा केला असल्याच्या चर्चा होत आहेत. परंतु आता या फोटोजचा खुलासा झाला आहे. 

 
 
 
 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

 

 
 
 
 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांनी एकत्र एका कोल्ड्रिंकच्या जाहिरातीसाठी शूट केलंय. पोस्ट केलेले फोटो त्याच जाहिरातीचा शेवटचा भाग होता. दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवरून एक फोटो पोस्ट करत 'त्याने मला विचारलं आणि मी हो म्हटलं' असं कॅप्शनही दिलं आहे. तिने केलेल्या या पोस्टमुळे मात्र तिच्या चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आणि चाहत्यांकडून तिला शुभेच्छाही दिल्या जात आहेत. परंतु काही वेळात टायगर आणि दिशाने त्यांच्या जाहीरातीचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

 
 
 
 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

 

 
 
 
 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

गेल्या अनेक दिवसांपासून दिशा आणि टायगर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. परंतु दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. टायगर आणि दिशाने 'बागी 2'मध्ये एकत्र काम केलं होतं. 'बागी 2'ने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. दिशा पटानी आगामी 'भारत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर टायगर श्रॉफ त्याच्या आगामी 'स्टूडंट ऑफ द इयर 2' आणि 'बागी 3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.