वीजेच्या वेगाने धावणाऱ्या टायगरचं हे रूप पाहिलंत का? क्षणार्थात केली धावपट्टी पार

टायगरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 4, 2022, 08:09 PM IST
वीजेच्या वेगाने धावणाऱ्या टायगरचं हे रूप पाहिलंत का? क्षणार्थात केली धावपट्टी पार title=

मुंबई : बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफ हा अॅक्शन हीरो म्हणून ओळखला जातो. टायगर श्रॉफची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टायगरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये फक्त भारतात नाही तर परदेशातही आहे. टायगर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याचे व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. टायगरनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. 

टायगरने नुकताच एक व्हिडीओ 'कू' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या व्हिडीओत टायगर काही मुलांसोबत रेस करताना दिसत आहे. ‘संघर्ष कितीही मोठा असू द्या जर निश्चय केला तर विजय नक्की मिळतो.’ असा संदेश या व्हिडीओतून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. टायगरने केलेल्या पोस्टलाही चाहत्यांकडून जबरदस्त असा प्रतिसाद मिळतो आहे. 'अपनी ही दौड़ दौड़ रहा हूँ….' असं म्हणत टायगरने ही पोस्ट केली आहे. 

मनाला भिडणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘जय आणि पराजय हे फक्त तुमच्या विचारावर अवलंबून असतात’ हे अधोरेखित होतं. युद्धात उतरण्यापूर्वी तुम्ही निश्चय केलात की मला ही लढाई जिंकायचीच आहे, तर तुम्हाला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. हाच आत्मविश्वास या व्हिडीओमध्ये इतर प्रतिस्पर्ध्यांशी धावण्याच्या स्पर्धेत मुकाबला करणाऱ्या टायगरच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. विशेष बाब ही, की टायगरने मनाशी केलेल्या निश्चयामुळे तो सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ही स्पर्धा जिंकताना दिसतोय. 

टायगरच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचं झाल्यास त्याचे एकापाठोपाठ ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटांची उत्सुकता आहे. त्याच्या आगामी चित्रपटांच्या यादीतला विकास बहल यांचे दिग्दर्शन असलेला 'गणपत: पार्ट 1' सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेला 'बड़े मियां छोटे मियां'चीही चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होईल. शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केलेला 'स्क्रू ढीला है' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे