मुंबई : बॉलिवूड स्टार अभिनेत्री करीना कपूर आपल्या लाडल्याबाबत काही गोष्टी सांगितल्या. तिच्या लाडल्याला पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. तिच्या लाडल्याचे नाव आहे तैमूर. या तैमूरला जास्त किस केलेले आवडत नाही, हे आई करीनाने सांगितले.
तैमूरला मी दररोज हजारो किस करते. मात्र, सारखा किस केलेला त्याला आवडत नाही. तो लगेच चिडतो. त्याला ही गोष्ट आवडन नाही, असे आई करीनाने सांगितले.
करीनाने एका मासिकाला मुलाखत दिली. करीनाचा मुलगा तैमूर खूप सुंदर आहे. त्याचा पापा घ्यायचा प्रयत्न केला तर तो सावध होतो. तो पापा घ्यायला देत नाही. मात्र, तैमूर खूप सुंदर असल्याने मी त्याला दिवसभर पाहत असते. त्याचे गोड पापा घेत असते. मात्र, तो मला पाठिमागे ढकलतो. तसेच सैफही मला असे करण्यापासून रोकतो, असे करीनाने सांगितले.