अमृता, करीनापेक्षा सुंदर आहे सैफची एक्स; हिच्यामुळंच मोडला होता संसार!

आज आम्ही ना तुम्हाला सैफच्या मुलांविषयी सांगणार आहोत ना करिना विषयी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला सैफच्या आयुष्यातील अशा व्यक्तीविषयी सांगणार आहोत. ज्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. आता तुम्हाला वाटलं असेल आम्ही त्याच्या एक्स पत्नी अमृता विषयी बोलत आहोत, तर आज आम्ही तिच्या विषयी देखील बोलत नाहीये. आज आम्ही तुम्हाला सैफच्या एक्स गर्लफ्रेंड विषयी सांगणार आहोत.

सायली कौलगेकर | Updated: Aug 16, 2023, 01:21 PM IST
अमृता, करीनापेक्षा सुंदर आहे सैफची एक्स; हिच्यामुळंच मोडला होता संसार! title=

मुंबई : आज सैफ अली खान त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर ही बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी आहे. करिना आणि सैफ दोन गोंडस मुलांचे पालक आहेत. मोठ्या लेकाचं नाव तैमुर तर धाकट्याचं जहांगिर असं नाव आहे. अनेकदा हे कपल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. तर अनेकदा त्यांचे मुलं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा तैमुर मीडियाशी धमाल करताना दिसतो. मात्र आज आम्ही ना तुम्हाला सैफच्या मुलांविषयी सांगणार आहोत ना करिना विषयी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला सैफच्या आयुष्यातील अशा व्यक्तीविषयी सांगणार आहोत. ज्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.

आता तुम्हाला वाटलं असेल आम्ही त्याच्या एक्स पत्नी अमृता विषयी बोलत आहोत, तर आज आम्ही तिच्या विषयी देखील बोलत नाहीये. आज आम्ही तुम्हाला सैफच्या एक्स गर्लफ्रेंड विषयी सांगणार आहोत. जी दिसण्याच्या बाबतीत अमृता आणि करिनालाही मागे सोडते. 

या अभिनेत्याने दोनदा लग्न केलं आहे आणि या दोन लग्नांमध्ये त्याचं एका परदेशी मॉडेलसोबत अफेअर होतं. अशी बातमी आहे की सैफची ही एक्स गर्लफ्रेंड त्याच्या दोन्ही पत्नींपेक्षा खूपच सुंदर आहे.. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही मॉडेल..

सैफ अली खान आणि करीना कपूर अनेकदा सार्वजनिक कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्ये एकमेकांचा हात धरताना दिसतात. करीना आता पतौडी कुटुंबाची सून झाली आहे. सैफ अली खान अनेक दिवसांपासून पहिली पत्नी अमृता सिंग आणि मुले सारा आणि इब्राहिमसोबत दिसत नाही. अनेक दिवसांपूर्वी हे तिघेही सैफसोबत फिरताना दिसले होते.

सैफच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव रोजा कॅटालानो असं आहे. करीना कपूरच्या आधी सैफ अली खानची एक विदेशी गर्लफ्रेंड होती हे फार कमी लोकांना माहीत असेल. केनियामध्ये एका शोदरम्यान सैफची रोजासोबत भेट झाली. त्यानंतर रोजाही कामाच्या शोधात भारतात आली पण जेव्हा तिला सैफच्या वैवाहिक आयुष्याविषयी माहिती मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला. रोजा कॅटालानो एक स्विस मॉडेल असून तिचा जन्म इटलीमध्ये झाला होता.

एका मुलाखतीत रोजाने खुलासा केला होता की, सैफने तिला त्यांच्या लग्नाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. दरम्यान, रोजावरुन अमृता आणि सैफमध्ये मतभेद सुरू झाले. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. पण दुसरीकडे रोजानेही सैफसोबत ब्रेकअप केलं. यानंतर सैफने विलंब न लावता करीना कपूरसोबत लग्न केलं. सैफने 1991 मध्ये अमृता सिंगसोबत लग्न केलं होतं, मात्र 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.