अक्षय कुमारनं सुनील शेट्टीला केलं 'वेलकम'!, चाहत्यांसाठी खास सरप्राईज, आनंदानं माराल उड्या

Welcome 3 Suniel Shetty: आपल्या सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे Hera Pheri च्या तिसऱ्या भागाची. परंतु आता यावेळी अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टीही दिसणार आहे. ही गुडन्यूज नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 16, 2023, 01:09 PM IST
अक्षय कुमारनं सुनील शेट्टीला केलं 'वेलकम'!, चाहत्यांसाठी खास सरप्राईज, आनंदानं माराल उड्या title=
August 16, 2023 | akshay kumar and suniel shetty will be now seen in welcome 3 toghter pre production begins soon

Welcome 3 Suniel Shetty: 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागातून सुनील शेट्टी, परेश रावल आणि अक्षय कुमार हा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. परंतु हा चित्रपट कधी येणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी खास चर्चा आहे ती म्हणजे वेलकम या चित्रपटाची. 2008 साली हा चित्रपट पहिल्यांदाच आला होता आणि या चित्रपटानं सर्वत्र हंगामा केला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. सोबतच यावेळी चर्चा आहे ती म्हणजे सुनील शेट्टीची समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार सुनील शेट्टी हा लवकरच वेलकम 3 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता ही शिगेला पोहचली आहे. सध्या याची सर्वत्र चर्चा आहे. तुम्हाला माहितीये का की आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल कारण याचे लवकरच प्रि-प्रोडक्शन सुरू होणार आहे. 

'पिंकविला'नं याविषयीचे वृत्त सादर केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. येथे म्हटलं आहे की, फिरोज नाडियावाला आणि अक्षय कुमार हे लवकरच  Welcome 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचवेळी आवारा पगला दिवाना 2 आणि हेरा फेरी 3 चेही शुटिंग होणार आहे. संंजय दत्त आणि अर्शद वारसीही यावेळी या चित्रपटातून समोर येणार आहेत तर या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की जॅकलिन फर्नाडिन्स आणि दिशा पाटनीही यावेळी या फिल्ममधून एकत्र येणार आहेत. या रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या प्रि-प्रोडक्शनला सुरूवात झाली असून यावेळी या चित्रपटाच्या लोकेशनसाठी धडपड सुरू आहे. त्यातून यावेळी सुनील शेट्टी या चित्रपटातून फार महत्त्वाची भुमिका करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. 

हेही वाचा : Gadar 2 ची हवा ओसरली? छे...स्वांतत्र्यदिनी विक्रमी कमाई करत गाठला 'इतक्या' कोटींचा पल्ला 

सध्या चर्चा होती ती म्हणजे सुनील शेट्टी यांच्या लेकीच्या अथिया शेट्टीच्या लग्नाची. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. क्रिकेटर के.एल. राहूलशी अथियानं मागील वर्षी विवाह गाठ बांधली आहे. तिचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. 

सध्या अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे परंतु यावेळी Gadar 2 नं या चित्रपचाला मागे टाकलं आहे.