'यापेक्षा देसी सपनाच बरी...' सपना चौधरीचा नवीन लूक पाहताच चाहत्यांचा हिरमोड

नेहमीच सपनाला ट्रेडिशनल कपड्यात पाहाणाऱ्या तिच्या चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. 

Updated: Mar 30, 2022, 07:48 PM IST
'यापेक्षा देसी सपनाच बरी...' सपना चौधरीचा नवीन लूक पाहताच चाहत्यांचा हिरमोड title=

मुंबई : सोशल मीडिया स्टार आणि डान्सिंग सेन्सेशन सपना चौधरीने आता. फॅशनच्या जगात देखील पाऊल ठेवलं आहे. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड कपडे आणि स्टाईल कॅरी करत आहे. यासंदर्भातील तिची फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. परंतु सपनाला सर्वच गोष्टीत पाठिंबा देणारे तिचे फॅन्स तिच्या या फॅनशमुळे ना खूश झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर सपनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्याची जोरदार चर्चा आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये सपना सिल्वर रंगाच्या साडीत आहे. साडी पारंपारीक असली तरी सपनाने तिला स्टाईलिश पद्धतीने कॅरी केलं आहे. ज्यामध्ये सपना खरंच खूप सुंदर आणि कॉन्फिडंट दिसत आहे.

परंतु नेहमीच सपनाला ट्रेडिशनल कपड्यात पाहाणाऱ्या तिच्या चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. सपनाच्या चाहत्यांना तिचा हा स्टाईलिश लूक आजिबात आवडलेला नाही. तिचा हा लूक पाहून तिचे चाहते म्हणतायत की, यापेक्षा देसी सपनाच बरी.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोकांना सपनाला साध्या आणि देसी शैलीतच पाहायला आवडते, त्यामुळे त्याना या स्टाईलमध्ये सपना आवडलेली नाही. त्यामुळे चाहते तिच्या पोस्टवर भरभरुन कमेंट देखील करत आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ ती तेथे शेअर करत असते. जर तुम्ही सपना चौधरीचे इंस्टाग्राम पाहिले तर ते तिच्या अप्रतिम फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सपना चौधरीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा गावात मस्ती करतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये सपना एखादी सेलेब्रिटी नाही तर साध्या वेशात गावात मस्ती करत फिरत आहे.