पहिल्याच दिवशी 'टोटल धमाल' सिनेमाने कमवले एवढे कोटी

चाहत्यांना हसून लोट-पोट करायला लावणारा सिनेमा 'टोटल धमाल' सिनेमागृहात दाखल झाला. सिनेमाने चाहत्यांची चांगलीच दाद मिळवली आहे.

Updated: Feb 23, 2019, 10:57 AM IST
पहिल्याच दिवशी 'टोटल धमाल' सिनेमाने कमवले एवढे कोटी title=

मुंबई : चाहत्यांना हसून लोट-पोट करायला लावणारा सिनेमा 'टोटल धमाल' सिनेमागृहात दाखल झाला. सिनेमाने चाहत्यांची चांगलीच दाद मिळवली आहे. अभिनेता अनिल कपूर, अजय देवगन, रितेश देशमुख आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित स्टारर सिनेमा प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी १६ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असून सिनेमा मनोरंजनात्मक असल्याचे सांगितले आहे.

'टोटल धमाल' सिनेमात अजय देवगन, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, आणि  पीतोबाश हे कलाकार   झळकत आहेत. त्याचबरोबर सिनेमात कोबरा, वन्यप्रणी, वाघ सुद्धा दिसत आहेत. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित गुजराती कपल म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. खास गोष्ट म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टल सिनेमात एका माकडाची भूमिका साकारताना दिसत आहे. 'हॅंगओवर 2', 'जॉर्ज ऑफ द जंगल', 'नाइट अॅट द म्यूझियम' या हॉलिवूड सिनेमांमध्ये तिने अभिनय केले होते.
  
इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'धमाल' सिरीजचा 'टोटल धमाल' हा तिसरा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय सिनेमाचा अभिनेता आणि निर्माता अजय देवगनने घेतला. भारतात एफडब्ल्यूआईसीई ने घेतलेल्या निर्णयानुसार निर्मात्यांना पाकिस्तानमध्ये सिनेमे प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 भारतीय सीआरपीएफ जवान शहीद झाले. अभिनेता अजय देवगन, अनिल कपूर, अभिनेत्री माधुरी दीक्षित स्टारर 'टोटल धमाल' सिनेमाच्या संपूर्ण टीमने जवानांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत केली.