'भटकंती' फेम मिलिंद गुणाजी सध्या काय करतात? पाहा प्रवासवेड्या अभिनेत्याची नवी इनिंग

सध्या ते करतात तरी काय... पाहा 

Updated: Sep 14, 2022, 02:57 PM IST
'भटकंती' फेम मिलिंद गुणाजी सध्या काय करतात? पाहा प्रवासवेड्या अभिनेत्याची नवी इनिंग  title=
travel show bhatkanti Fame Actor milind Gunaji winning hearts learning instargam

मुंबई : काही कार्यक्रम हे त्यातील कलाकारांमुळे चर्चेत असतात. त्यांना इतकी प्रसिद्धी मिळते, की प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. असाच एक कार्यक्रम म्हणजे, भटकंती. महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांपासून पर्यटन स्थळांपर्यंतची सफर या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवण्यात आली होती. सध्या Travek Vlogs चा सुरु असणारा ट्रेंड खऱ्या अर्थानं मराठी प्रेक्षकांसाठी काही वर्षांपूर्वीच भेटीला आला होता. एक अविस्मरणीय प्रवास प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात मोलाचं योगदान होतं, ते म्हणजे अभिनेता आणि सूत्रसंचालक मिलिंद गुणाजी यांचं. (travel show bhatkanti Fame Actor milind Gunaji winning hearts learning instargam)

सोपं, सुरेख आणि खिळवून ठेवणारं सूत्रसंचालन, प्रवास आणि गड-किल्ले सर करण्यासाठी आवश्यक असणारी रांगडी शरीरयष्टी असं मिलिंद गुणाजी यांचं व्यक्तिमत्त्व टीव्हीच्या स्क्रीनवरून प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर आलं. 

धीरगंभीर आवाजात जेव्हा गुणाजी एखादा गड, गाव, किंवा सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या प्रदेशाची माहिती देत होते तेव्हा सानथोनर सर्वांचंच लक्ष त्यांच्यावर केंद्रीत होत होतं. तो आवाज प्रत्येकालाच हवाहवासा वाटत होता. काळ पुढे गेला, प्रवासावर आधारित असंख्य कार्यक्रमही साकारले गेले. पण, 'भटकंती' (Bhatkanti Full episode) आणि मिलिंद गुणाजी यांना मिळालेला प्रतिसाद काही औरच. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radio Nasha (@radionasha)

बरीच वर्षे प्रवास करणारा हा अभिनेता आजही या- न त्या कारणाने प्रवास करत असतो. प्रवासासोबतच ते Photography ची आवडही जपताना दिसतात. हल्लीच प्रदर्शित झालेल्या bhul bhullaiya 2 या चित्रपटातही ते झळकले होते. 

विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यासोबतच मुलाखती, चित्रपट या साऱ्यामध्ये गुणाजी व्यग्र असतात. मनाच्या कोपऱ्यात त्यांनी आजही भटकंती साठवून ठेवलीये. थोडक्यात प्रवास आणि मिलिंद गुणाजी यांना वेगळं करणं अशक्यच.