मनोहर जोशी यांच्या नातीचं Bold फोटोशूट; photo व्हायरल

सध्या अशाच एका अभिनेत्रीचे बोल्ड आणि ब्युटीफूल फोटोज हे चर्चेचा विषय ठरले आहेत. 

Updated: Sep 14, 2022, 02:35 PM IST
मनोहर जोशी यांच्या नातीचं Bold फोटोशूट; photo व्हायरल  title=

Actress Sharvari Wagh Bold Photos: हल्ली इन्टाग्रामवर सेलिब्रेटींच्या बोल्ड फोटोंमुळे (Celebrity Bold Photos) एकच धुमाकूळ उडतो. या फोटोंजना पुष्कळ लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. त्यातून अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज पाहून अनेकदा सेलिब्रेटींना ट्रोलही (Celebrity Trolling) केलं जात. पण अशा ट्रोलिंगवर पुष्कळ सेलिब्रेटी हे दुर्लक्षही करतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचे बोल्ड आणि ब्युटीफूल फोटोज हे चर्चेचा विषय ठरले आहेत. (bollywood actress and former chief minister manohar joshis granddaughter shares bold photoshoot on instagram photo goes viral on social media)

ही अभिनेत्री आहे शर्वरी वाघ (Sharvari Wagh). शर्वरीनं मागच्याच वर्षी सैफ अली खान (Saif Ali Khan), सिद्घान्त चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherji) अशा तडक्या स्टारकास्टसोबत बंटी और बबली 2 (Bunty Aur Babali 2) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Bollywood Box Office) आपली फार जादू दाखवू शकला नाही परंतु शर्वरी वाघची बॉलीवूडच्या प्रेक्षकांना नव्यानं ओळख झाली.  

शर्वरी वाघ (Sharvari Wagh) ही महाराष्ट्र (Former Chief Minister of Maharashtra) राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची नातं आहे. शर्वरीच्या आई (Sharvari Wagh's Mother) या मनोहर जोशी यांच्या कन्या आहेत. शर्वरीचं नावं आता सगळीकडेच लोकप्रिय झालं आहे. तिचे इन्टाग्रामवरही चार लाखाहून जास्त फोलोअर्स आहेत. ती आपल्या इन्टाग्राम पेजरवर चाहत्यांना (Sharvari Wagh's Fans) नेहमीच अपडेट ठेवत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकताच तिनं इंटरनेटवर आपलं हॉट फोटोशूट (Sharvari Wagh Bold Photos) पोस्ट केलं आहे. ज्यावर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. या फोटोत तिचा लुक अगदी मॉडर्न आहे. जीन्स (Jeans) आणि निळ्या आणि लाल रंगाचा क्रॉप स्वेटर (Crop Top) घातला आहे. ज्यात तिचा लुक खुपच बोल्ड आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनीही तिच्या या फोटोवर कौतुकाच्या कमेंट्स (Celebrity Comments) केल्या आहेत. तापमान वाढल्यावर मुंबईकरांच्या होणाऱ्या परिस्थितीचा लूक शर्वरी वाघने (Sharvari Wagh Instagram Caption) दिलाय. 

शर्वरी वाघ हिनं बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani), प्यार का पंचनामा 2 (Pyaar Ka Panchnama 2) अशा चित्रपटांसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही कामं पाहिलं आहे.